पान:औद्योगिक सहकारिता.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

20 NOV 2013 सोनं.. याचा ६९६ प्रास्ताविक. ग रु Com चतुःसीमांचे निसर्गदेवताच संरक्षण करण्यास सज्ज झाल्यानें तिजवर पूर्ण- पणे विश्वासून हिंदुस्थानदेश गेली कित्येक शतकें स्वस्थ चित्तानें अनेक बाजूंनी निद्रासुखांत मन झालेला होता. त्या अवधीत त्यावर परच आली नाहीत असें नाहीं, व कित्येक अंतस्थ राज्यक्रांत्याही घडल्या. पण दैनिक व्यवहाराची किंवा पोटापाण्याची त्याला कधींहीं विवंचना पडली नाहीं. स्ति शकाचे पंधरावे शतकाचे आरंभी जगाच्या एका भागांत एक क्रांति घडून येत होती. तिचा परिणाम उगमाच्या ठिकाणच्या लोकांस सुद्धां आरंभीं कळून आला नाहीं; पण दोन तीनों वर्षाचे अवधीत तिने जगांतील सर्व देशांत खळवळ करून सोडली. ज्यांची झोंप हलकी ते लवकर सावध झाले व खडबडून उठून आपल्या उद्योगासही लागले. कां- हीना हालवून जागे करावे लागले व कांहींना तर अजूनही हादरवून धक्के देऊन जागे करावे लागत आहे. विचान्या हिंदुस्थानची अवस्था या दुसन्या कोटीत आली आहे. नैतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशा अनेक कारणांनी येथील लो- कांची मनःप्रवृत्ति एका विशिष्ट प्रकाशची बनली होती. सुमार एकोणि- साव्या शतकाच्या आरंभी याचा परिणाम असा दिसूं लागला कीं, स्वतः- पलीकडे बहुजन समाजाची दृष्टी जाईनाशी झाली व तीही स्वार्थी बुद्धी बन्याच खालच्या पायरीची बनली होती. हिंदुस्थानवासी लोक म्हणजे एका लेखकाने म्हटल्याप्रमाणें an aristocracy of beggars प्रतिष्ठित भि क्षेकन्याच्या स्थितीस येऊन पोहोंचले होते. इकडे जगामध्यें होऊं घातलेल्या मन्वन्तरांत संपत्तीस विशेष मान मिळू लागला, व त्याचें पर्यवसान तूर्त तरी तिजला देव पदाप्रत आणून ठेव- ज्यांत झाले आहे. पैशाकरितां व्यापार व व्यापाराकरितां जगभर धिंगाणा अशी परंपरा उत्पन्न झाली आहे. या परिस्थितीतून एकटा हिंदुस्थान कस श्री सौ. गं. पं. भोर