पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

अहमदनगर जिल्हा

हो, बदल घडतोय...

 अहमदनगर जिल्हा हा धार्मिक सद्भावना सांगणा-या शिर्डीच्या साईबाबांचा जिल्हा. पण या जिल्हयात शिर्डीसह १३ तालुक्यांपैकी ९ तालुके हे मुलींची संख्या कमी असणारे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रमातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले
.

 संगमनेर तालुक्यात मुलींची संख्या भयावह पध्दतीने कमी झाल्याने जिल्हाधिकारी श्री. अनिल कवडे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. ग्रामसेवक आणि सरपंच मोठ्या संख्येने पूर्णवेळ प्रशिक्षणासाठी हजर होते. स्त्रीयांच्या प्रश्नांवर मोठ्या संख्येने पुरुषांचा सहभाग ही विशेष बाब या प्रशिक्षणादरम्यान घडली. तालुका स्तरावर येऊन मा. जिल्हाधिका-यांनी सन २०२१ पर्यंत जिल्ह्यातील मुलींची संख्या वाढविणे या प्रश्नाला प्राधान्यक्रम दिले जाईल असे सांगितले.
  दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन कुंडीतील झाडाला पाणी घालून करण्यात आले.
 'सबका मालीक एक है' हा विचार समस्त जगाला देणा-या साईबाबांचा जिल्हा हा स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार करणारा ठरेल. त्यासाठी कालबध्द अभियान राबविण्याचा निर्णय मा. जिल्हाधिका-यांपासून ते ग्रामसेवकापर्यंत या प्रशिक्षणादरम्यान सर्वांनी केला आहे.