पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि राज्यशास्त्र

१४१


 (४) ख्रिश्चन लोकांचे न्यायाधीश किंवा प्रांताधिकारी यांना बडतर्फ करावयाचा अधिकार कोणालाही नाही. ते आपल्या अधिकारावर कायम राहतील.

 (५) प्रवास करतेवेळी कोणाही खिश्चन माणसाला कोणीही त्रास देऊ नये.

 (६) त्यांच्या प्रार्थनामंदिरांत ते जात असतां त्यांना कोणीही प्रतिकार करावयाचा नाही.

 (७) युद्धाचे वेळी युद्धामध्ये सामील होण्याकरिता त्यांच्यावर जबरदस्ती केली जाणार नाही किंवा युद्धाकरितां त्यांचेजवळून करही वसूल केला जाणार नाही,

 (८) एकाद्या ख्रिश्चन स्त्रीने मुस्लिमाशी विवाह केला तर त्या मुस्लिमास आपल्या खिश्चन स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या धर्मापासून परावृत्त करण्याचा हक्क नाही.

 (९) प्रार्थनामंदिरें बांधतांना खिश्चन लोकांची गैरसोय कोणीही करूं नये. प्रार्थनामंदिरें किंवा मठ बांधतांना त्यांना मदतीची जरूरी लागेल तर मुस्लिमांनी त्यांना मदत केली पाहिजे.

 (१०) त्यांच्याविरुद्ध कोणीही शस्त्र उचलतां कामा नये.उलट त्यांच्याकरितां मुस्लिमांनी लढावयास तयार झाले पाहिजे, आपल्या राज्याबाहेरील ख्रिश्चन लोकांशी मुस्लिमांनी युद्ध पुकारले तर आमच्या येथील खिश्चन नागरिक आपल्या शत्रूचा धर्मबंधू आहे म्हणून मुस्लिमांनी त्याचा द्वेष किंवा तिरस्कार करूं नये.

 (११) माझ्या कोणीही नागरिकानें या जाहीरनाम्याचा