पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इतर अवयव/ कृत्रिम वस्तूचा वापर जननेंद्रियांव्यतिरिक्त शरीराचे इतर अवयव किंवा एखादी कृत्रिम वस्तू जबरदस्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या जननेंद्रियांमध्ये घालण्याला बलात्कार समजला जावा. जननेंद्रियांव्यतिरिक्त शरीराचे इतर अवयव वापरून किंवा एखादी कृत्रिम वस्तू वापरून स्वतःशी केलेला संभोग गुन्हा समजला जाऊ नये. जननेंद्रियांव्यतिरिक्त शरीराचे इतर अवयव वापरून किंवा एखादी कृत्रिम वस्तू वापरून प्रौढांनी संमतीने केलेला संभोग गुन्हा समजला जाऊ नये. लों कमिशन लॉ कमिशनच्या १७२व्या अहवालानी सुचवलं की, ३७५ बलात्कारावरचं कलम बदलून ते लैंगिक अत्याचाराचं कलम करावं. त्या कलमाखाली संमती नसताना केलेला योनीमैथुन, मुखमैथुन, गुदमैथुन व कृत्रिम वस्तूचा वापर करून केलेला संभोग गुन्हा ठरवावा. त्याच बरोबर ३७७ कलम रद्द करावं असंही सुचवण्यात आलं. [38] ही नवीन व्याख्या लिंगभेद करत नाही (पुरुष व स्त्रिया यांना एकाच मापात तोलते) व या नव्या व्याख्येत सुध्दा नवऱ्याने बायकोची संमती नसताना बायकोबरोबर केलेला संभोग गुन्हा मानलेला नाही, म्हणून काही स्त्रीवादी संघटनांनी या नव्या व्याख्येचा विरोध केला. नैसर्गिक व अनैसर्गिक संभोग गुदमैथुन व मुखमैथुन जर अनैसर्गिक मानायचे झाले तर मग प्रश्न पडतो की, कोणत्या कृत्याला नैसर्गिक समजायचं? प्रजननासाठी केलेली शरीराची, मनाची रचना नैसर्गिक? निसर्गाने ज्या कारणांसाठी जे अवयव दिले आहेत ते त्याच कारणांसाठी वापरणं हे नैसर्गिक? निसर्गात ज्या त-हेचे लैंगिक संबंध दिसतात ते नैसर्गिक? जे उपजत येतं ते नैसर्गिक? प्रजननासाठी केलेली शरीराची, मनाची रचना लैंगिक संबंध फक्त प्रजननासाठीच केले जातात का? लैंगिक संबंध हा जोडप्यांचा प्रेमाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. दर वेळी संभोग फक्त प्रजननासाठी केला जात असता तर कंडोमचा काय उपयोग? एकमेकांना प्रेम, आनंद, सुख देणं हा लैंगिक संबंधाचा मोठा भाग आहे. भिन्नलिंगी नवरा-बायकोच्या नात्यात हे पैलू नसतात का? नवरा, बायको या दोघांना काही कारणानी मूल होणार नसेल, किंवा नको असेल तर त्यांच्या नात्याला काही अर्थ नाही का? मग त्यांनी संसार करायचा नाही का? एखाद्या लैंगिक नात्यातून प्रजनन होणार नसेल तर प्रेम करणं, शरीरसुख घेणं/देणं चुकीचं आहे, हा निष्कर्ष आपण कसा काढायचा? 1 इंद्रधनु ४३