पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समलिंगी लोकांचे अधिकार विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही पाश्चात्त्य देशात समलिंगी चळवळीला वेग आला. समलिंगी कार्यकर्त्यांनी कायदा, वैद्यकीय व सामाजिक दृष्टिकोन बदलण्यास अनेक वर्ष झुंज दिली. अथक परिश्रमानंतर त्यांना हळूहळू यश येऊ लागलं. प्रत्येक देशातल्या समलिंगी अधिकारांच्या चळवळीने वेगवेगळे यशाचे टप्पे गाठले. काही देशांनी प्रौढांमध्ये संमतीनं केलेल्या समलिंगी संभोगाला गुन्ह्याच्या यादीतून काढून टाकलं. उदा. चीन, जपान, अमेरिका, रशिया इ. काही देशांनी समलिंगी जोडप्यांच्या लग्नाला कायद्याने मान्यता दिली. उदा. फ्रान्स, कॅनडा इ. काही देशांनी याच्यापुढे जाऊन समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक देण्यासाठी मान्यता दिली. उदा. स्विडन, बेल्जियम, काही देशात समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती होता येतं. उदा. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया. व्यक्ती भिन्नलिंगी असोत वा समलिंगी असोत एक समान पातळीची समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी ही चळवळ अनेक देशात चालू आहे. भारतातील वाटचाल १९८० च्या दशकापर्यंत समलैंगिकता हा बोलण्याचा विषय नव्हता. समलैंगिकता पाश्चात्त्य देशातील विकृत संस्कृतीचं रूप आहे, ही धारणा होती. समलिंगी लोकांचे प्रश्न कोणी मांडत नव्हतं. या पार्श्वभूमीवर १९८६ साली अशोक राव कवींनी 'सॅवी’ मासिकात मुलाखत देऊन त्यांची समलैंगिकता जाहीर केली. या मुलाखतीने खळबळ उडाली. कोणी तरी खुलेआम अभिमानाने सांगत आहे की, ती व्यक्ती समलिंगी आहे ही गोष्ट अनेकांना धक्कादायक होती. अशोक राव कवी : भारतातले पहिले समलिंगी कार्यकर्ते (Gay Activist ) (Photo Source http//wikipedia.org/wiki/Ashok_Row_Kavi) इंद्रधनु... ११५