पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ अधिक किमतीने घेऊं नये, व बांक याच्या चिठ्या कमी किमतीनें घेऊं नयेत. जुलै महिन्याचे २४ वे तारिखेस पार्लमेंट सभेची बैठक नवेंबर महिन्याचे १२ वे तारि- खेपर्यंत बंद असावी, असा हुकूम झाला. व त्या दिवशीं पुनः हुकूम झाला कीं, पुढले जान्युआरी महिन्याचे ७ वे तारिखेपर्यंत ती आणखी बंद असावी. बाहेर देशांत स्पानियर्ड व पोर्टुगीस आणि त्यांचे क्रूर शत्रु यांचे लढायांत उभयपक्षींचे जय पराजय झाले; परंतु साधारण एक गोष्ट अशी की, ब्रिटिश फौज लढा- ईंत आली ह्मणजे बोनापार्ट याच्या पलटणींचा अजिंक- पणा नाहीं असा होई; आणि कित्येक विजय असे झाले कीं, त्याची विस्मृती ब्रिटिश यांस व स्पानिवर्ड आणि पोर्टुगीस यांस कधीं पडली नाहीं. बारोसा एथें मार्च महिन्याचे ५ वे तारिखेस ब्रिटिश व फ्रेंच यांमध्ये लढाई झाली, तींत ब्रिटिश लोक कमी असतां व दुसऱ्या फार अडचणी असतांही सुमारे दीड तासाचे आंत सर्व फ्रेंच फौज पळून गेली. त्या लढाईत फ्रेंच यांचे मेले, जखमी वगैरे मिळून एकंदर तीन हजार लोक नाहीं असे झाले, त्यांचे निशाण आणि सहा तोफा विजयी फौजेचे हाती लागल्या, आणि जनरल रफिन रोसे, व बेलगार्ड कैद झाले. त्यांतून पहिला जखमी होता, व दुसरा लढाईनंतर लवकरच मेला. या लढाईत इंग्लिश यांचा सरदार जनरल ग्राहाम होता. ही वरची लढाई होण्याचे पूर्वी बेत झाला होता की, तेव्हांच सर आरकीन्स यानें केडिझ एथील समुद्रांत फ्रेंच यांवर हला करावा; परंतु तो हला वाऱ्यामुळे न होऊन