पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकार, (५) मधुमेह - एक आगळा दृष्टिकोन - या सर्व ग्रंथांत 'मानसाला' प्रथम स्थान देऊन रोग, रोगनिर्मिती, उपचार व आरोग्य यांची गुंफण केली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात 'अध्यात्माचे महत्त्व' काय आहे हे आपणास जाणून घ्यावयाचा प्रयत्न करावयाचा आहे. त्याची पूर्वपीठिका म्हणून हा केलेला यशाशक्ती प्रयत्न. तरीसुद्धा वेळोवेळी आयुर्वेद, पातंजल योगसूत्रे विशेषतः हठयोग यांचा उल्लेख व आधार योग्य ठिकाणी येईलच. येथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे इष्ट आहे की उपनिषदांची भाषा व शब्द यांत जरा गूढतेचा भास दिसतो. वरवरचा अर्थ व त्याचा गर्भित अर्थ हे समजावून घेणे इष्ट ठरेल. पुढील चर्चेत हे अर्थ समाविष्ट आहेत.



  

७८