पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
 भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥२॥
 “खल, दुष्ट लोक आपला दुष्ट स्वभाव (दुष्टता) टाकून देवोत.
 आणि सत्कर्माविषयी आवड अंगी बाणवोत (विश्वातील) सर्व
 प्राणीमात्र एकमेकांशी मैत्री करोत ॥२॥

 हे मैत्रमानवाने प्राण्यांच्याही संबंधात निर्माण करावयास पाहिजे. अंती तेच मानवाचे हित करणार आहे. जगात आज असलेला दुष्टता, क्रौर्य यांचा अंधार नष्ट होवो (दुरितांचे तिमिर जावो). आपण घेतलेला आढावा या तत्त्वाला अनुसरूनच आहे. हे समजून घेतले तर पुढे विकारमुक्ती व वैद्यक यांची जी चर्चा करणार आहोत ती सहज समजू शकेल.

४४