पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हे स्वच्छ करून बारीक चिरून एकत्र करावे व कमीत कमी पाणी घालून कुकरमध्ये वाफलावे. मिक्सरमधून नंतर त्याची पेस्ट करून एका बाऊलमध्ये घालून फ्रीझमध्ये ठेवावे. यातून सर्व उपयुक्त पोषक घटक मिळतातच पण ऊर्जा मात्र फार थोडी. यातून पुढील गोष्टी करता येतात-
 (१) व्हेज सूप : १ ग्लास गरम पाण्यात २ मोठे चमचे पेस्ट.
 (२) कोशिंबीर : २ चमचे पेस्टमध्ये दही घालून तयार करावी.
 (३) डाळ / आमटीमध्ये घातल्यास डाळ पालक सारखे पदार्थ
 (४) ताकात घालून जेवताना घ्यावे.
 (५) कणकेत मिसळल्यास पराठे होतात.
 चवीसाठी या सर्व पदार्थांत मिरपूड, मसाला, थोडी हिरवी मिरची घालण्यास हरकत नाही. परंतु तिखट करू नये. ही फक्त वृद्धांनाच नव्हे तर सर्वांनाच उपयुक्त आहे. अशाच चटण्याही उपयुक्त आहेत.  (१) कोथिंबीर (देठे टाकू नयेत ), पुदिना ( देठासकट) व कढीपत्ता ही समप्रणामात घेऊन याची चटणी वाटावी. शक्यतो खोबरे (ओले) घालू नये कारण एकूण आकारमानाशी कोथिंबीर - पुदिना यांचे प्रमाणे कमी होते. खोबरे वापरल्यास चटणी जास्त घ्यावी. दररोज २ चमचे चटणी आहारात असावी.
 (२) जवस वा आळशी (Linseed / Flax) कुटून चटणी करावी. ती तेलकट दिसली पाहिजे एवढी कुटावी किंवा मिक्सरमध्ये बारीक करावी. ही हृदयरोग व कॅन्सरला उपयुक्त आहे. याचे तेल अर्धा ते एक चमचा हृदयरोग व कॅन्सरला आळा घालू शकते असे वैज्ञानिकांना आढळले आहे.

 आपण वर म्हटले की कॅलरीजपेक्षा ( ट्रेस एलिमेंटस्) सूक्ष्म पोषक घटकांवर जास्त लक्ष दिले पाहिजे. यावर वैज्ञानिक मत काय आहे? विशेषतः वृद्धापकाळात त्यांचे किती महत्त्व आहे? अकाली वृद्ध, त्याविषयी जो आधार मिळाला आहे तो रिचर्ड व रुसेल यांनी १९९९ साली लिहून ठेवला आहे. "टोकोफेरॉल, कॅरोटिनाईड्स् व 'क' जीवनसत्त्व, तसेच झिंक व सेलेनिअम यांची उणीव अकाली वृद्धत्व आणू

३१६