पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वृद्धांच्या आहार व पोषण यांच्या गरजा :
 वृद्धत्व येणे ही गोष्ट (१) अटळ असते (२) ते चक्र उलट फिरवून तारुण्य प्राप्ती अशक्य आहे. (३) ते हळूहळूच येत असते. काल तरुण होतो व आज अचानक वृद्ध झालो असे घडत नाही. उलट ते सतत वर्षानुवर्षे मुंगीच्या पावलांनी पण सतत वाढत असते. ग्रीक पुराणात अपोलो हा फार मोठा देव. त्याच्या प्रार्थनेत हे वाक्य आहे -.
 “परमेश्वरा, मी ऐन तारुण्यात मेलो तरी हरकत नाही
 परंतु तो मृत्यू जितका उशिरात उशिरा येईल असे कर.
या प्रार्थनेमागली भावना काय आहे? तो भक्त म्हणतो आहे की, ईश्वरा, मरण हे तर अटळ आहे, परंतु मला दीर्घायुष्य दे व माझी कार्यशक्ती अखंड टिकू दे. ही जी कार्यशक्ती कमी होत असते ती निरनिराळ्या शरीरसंस्थांचे बाबत निरनिराळी म्हणजे सुमारे २०% ते ५०% एवढी वय वीस ते साठ या काळात कमी होत असते. आपण जन्मानंतर सरणाऱ्या कालखंडानुसार आपले वय मोजतो. मी आता वीस वर्षांचा झालो, चाळिशी ओलांडली इत्यादी म्हणजे जन्मानंतर एवढा कालखंड गेला आहे. परंतु व्यवहारात या कालखंडाला अनुरूप गणिती पद्धतीने शरीरम्हास कधीच घडत नसतो. अत्यंत वृद्ध माणसेही अत्यंत कार्यक्षम असतात भीष्म कुरुक्षेत्रावरील लढाईचे वेळी एकशेवीस वर्षांचे होते, द्रोणाचार्य शंभर वर्षांचे होते. अर्जुन व कृष्ण हे साठीला आले होते. तरी त्यांचा पराक्रम, एखाद्या तरुणाप्रमाणे असणारी कार्यशक्ती, ही वयाच्या वर्षानुसार असण्यापेक्षा कितीतरी जास्त होती. शिवकालीन कोंडाण्याची लढाई सुप्रसिद्ध आहे. तानाजी पडल्यावर त्याचा मामा शेलारमामा वृद्ध असूनही त्याने अतुल पराक्रम केला. आजही नव्वदी ओलांडलेले काही लोक अद्यापही कार्यरत आहेत. ही उदाहरणे पाहिली की खात्री होते की एकतर आपण अकाली वृद्ध समजून वागत असतो किंवा उगीचच तारुण्याची आव आणत असते. वयानुसार होणारा शरीर-हास हा फारच कमी असतो, पण चुकीची जीवनशैली, कुपोषण घडवणारा आहार या गोष्टी समुच्चयाने अकाली वृद्धत्व आणत असतात.

 संशोधनातून हे निष्कर्ष निघाले आहेत. आहार निश्चितपणे -हासाचा वेग कमी

३११