पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बदल योजना पाहिजे. नाहीतर मग मृत्युसमय आला की भयंकर ताण, मनाची भयग्रस्तता यांना सामोरे जावे लागते.  १९७९ साली असा एक अभ्यास केला गेला. त्याचे नाव 'सीनिअर अॅक्चुअलाझेशन ॲन्ड ग्रोथ एक्लोरेशन' (SAGE). त्या अभ्यासकांनी ज्येष्ठ नागरिक व समाजधारणा यांचा अभ्यास केला. अनेक ज्येष्ठ नागरिकांचा अभ्यास केल्यावर त्यांनी या ज्येष्ठ नागरिकांना शरीर व मनाची शिथिल अवस्था, चिंतन, प्राणायाम, ध्यानधारणा, योगसाधना यांचा अभ्यास करावयास शिकवले. कृतिशील जीवन म्हणजेच निर्मिती. यात संगीत, कलाशिक्षण या गोष्टीत सक्रिय भाग घेण्यास प्रवृत्त केले. ही योजना यशस्वी झाली. त्यात भाग घेणारे लोक आपले निवृत्त जीवन कृतिशील, समाज व स्वतः यांना पोषक असणारे कंठू लागले. एकूणच त्यांची जीवनशैली अशी बदलली की निरामय वृद्धावस्था म्हणजे काय, वृद्धत्वाशी कसे जमवून घ्यावे, व त्या कालखंडात निर्माण होणाऱ्या समस्यांना कसे ताण न येऊ देता तोंड द्यावे हे धडेच ते शिकले. त्यांनी आपले मृत्युपत्र करून, मृत्यूपर्यंत वैद्यक साहाय्याला साथ दिली.  हे काही विचार झाले. चिंतनामधून इतरांना आणखीही मार्ग सुचतील. हे मार्ग असंख्य असतील परंतु सर्वांचे ध्येय एकच असल्यामुळे शेवटी त्यांचा सुरेख संगम होईल. “आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति ॥ " आपले मन जर स्थिर होत नसेल, या अध्यात्ममार्गाची खरी ओढ नसेल, तर अंतिम उद्देश कधीच सफल होणार नाही. यासाठी जे चिंतन करावे लागेल त्याचा राजमार्ग पुढील प्रश्न व आपली उत्तरे ठरवतील. विकारी लोकांनी हे स्वतःस विचारावे म्हणजे विकाराचे भय नाहीसे होईल, विकार बरे होण्यास मदत होईल
. प्रश्नावली :
 अंतरीच्या शक्तीसाठी पुढील प्रश्न उपयोग पडतील -

  • आपल्याला भक्तिमार्ग वा गीतेतील भक्तियोग याची ओढ व आदर वाटतो का? पूजा हा एक मनाच्या उन्नतीचा उत्तम मार्ग आहे यावर आपला विश्वास आहे

का?

३००