पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपणच औषधे घ्यावयाची. 'लोमोटिल' हे अतिसारमुक्तीसाठीचे (Antidiarrhoeal) औषध सौम्य अल्सरेटिव्ह पोटशूळावरही उपयुक्त आहे. सुदैवाने त्याला असा पोटशूळ नव्हता. शेवटी त्याच्या आजीने त्याला माझेकडे पाठवला. प्रथम मी त्याचे प्रबोधन करून आपली जीवनशैली सुधारण्यास सांगितले. ब्रेड बंद, तळणीचे पदार्थ बंद, कच्चे सलाड बंद व साध्या आहाराचा आराखडा दिला व औषधे दिली. त्याने हे सर्व श्रद्धेने पाळले आणि पूर्ण बरा झाला. काही केसेसमध्ये तर अन्न खाल्ले की लगेच त्या व्यक्तींना संडासाकडे पळावे लागते. असा हा आय्. बी. एस्.
 पोटात काहीतरी होत आहे अशी सुरुवात होते. हे काहीतरी होणे पोटाच्या डाव्या भागात (Left Quadrant) सुरू होते. कधी कधी ते छातीच्या पिंजऱ्याकडेही सरकते. हळूहळू भूक कमी लागू लागते. हे जर वारंवार होऊ लागले तर योग्य तपासण्या करून घेणे इष्ट असते. महत्त्वाची गोष्ट अशी की आपण पहिला घास खाल्ल्यापासून त्या अन्नाचा प्रवास सुरू होतो. चयापयातील पचनक्रियेला एक ठराविक कालखंड लागत असतो. मलविसर्जनही कालच्या अन्नाचे लगेच दुसऱ्या दिवशी होत नाही. अतिसार म्हणजे या संपूर्ण कालखंडात योग्य प्रवासच व्हावयास पाहिजे (Motility) तो कालखंडच कमी होतो व मग अन्न अंगी लागत नाही, अशक्तपणा येतो, नीट झोप लागत नाही, रक्तक्षय (अॅनिमिया) होऊ शकतो. यासाठी सुयोग्य म्हणजे सात्त्विक आहार व निसर्गाला अनुसरून दिनचर्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
 यांतील अनेक गोष्टी योग्य वा अयोग्य हे शरीरच आपल्याला सांगते. आहारातील योग्य बदल, व्यायाम, योगाभ्यास व ध्यानधारणा यातून होणारी सुधारणा शरीरच आपल्याला सांगत असते. ध्यानधारणेची कोणती रीत आपल्याला आवडते हे ज्याने त्याने स्वतःच ठरवावयाचे असते. मन स्वच्छ व शांत होणे हे महत्त्वाचे. "मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पिरिथ्वी मोलाची", हे प्रभातच्या सिनेमातील एकेकाळी गाजलेले गीत आठवावे.

 पचनसंस्थेचे व मलविसर्जनाच्या विकारांचे आपण विहंगावलोकन केले ते नमुना म्हणून. पण ही पद्धत सर्व विकारांत सर्वकाळ उपयोगी पडते. औषधोपचाराला ती

२९३