पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दर्पच येतो. मी स्वतः या पद्धतीचा पुरस्कार करतो आणि वापरतो, पण मी त्याला सर्वांगीण (Comprehensive) असे म्हणतो. हीच पद्धत सर्वश्रेष्ठ. यात फक्त औषधोपचार नाहीत. त्यात आहार, योगसाधना, आसने व प्राणायाम या सर्व अंतर्भूत आहेत. म्हणूनच तिला सर्वांगीण म्हणजे आरोग्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी, शरीरस्वास्थ्य व मनःस्वास्थ्य यांना प्रथमस्थान असणारी अशी ही पद्धत आहे. येथे औषधांच्या वापराला अगदी जरुरीपुरतेच महत्त्व आहे.
विकारांच्या मानसप्रतिमा :

 या विषयावर अमेरिकेत डॉ. जीन अॅक्टरबर्ग, डॉ. बार्बारा डॉसी व लेस्ली कोलमायर यांनी बरेच संशोधन व व्यावहारिक उपयोग करून अनेक रोग यामुळे कसे बरे होऊ शकतात ह्यावर बरेच लिखाण केले आहे. ते अनुभव व आपले अध्यात्म यांचे निकटचे नाते आहे हे मात्र सहज आढळते. सायकोथेरपी हीही अशीच पद्धत तिकडे विकसित केली गेली होती. या सर्वांचा समान दुवा एकाला एक असे समांतर वाहणारे प्रवाह. पण त्यांत वाहणारे 'जीवन' एकच. याला आणखीही 'ऑटोसजेशन' सारखी नावे दिलेली आहे. पण काही विचारवंत तज्ज्ञांनी अनुभवांती असे म्हटले आहे की मानसशास्त्र व वैद्यकशास्त्र यांद्वारा विकारांचे व विकारांच्या कारणांचे खरे ज्ञान होत नाही. परंतु निरनिराळ्या जातिजमातीतील परंपरा, धार्मिक कृत्ये ही पाहिली, त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर विकारांचे स्पष्ट चित्र आपल्या मनःचक्षूंसमोर येऊ शकते. आधुनिक लोक भले त्यांना कर्मकांड, निरर्थक अनुकरण, भोंदूगिरी काही म्हणोत. आपल्याकडेही देव, धर्म, पूजा-अर्चा, ध्यान-धारणा, जपजाप्य, व्रतवैकल्ये अशा गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतात व आपण नास्तिक आहोत हे मोठ्या अभिमानाने सांगतात. पण या सर्व गोष्टींचे जेव्हा कर्मकांड होते तेव्हाच त्यांचे म्हणणे सत्य असते. आपण गणपतीचा उत्सव करतो, रामनवमी, हनुमानजयंती साजरी करतो तेव्हा आपल्या मनात एक देवमूर्ती असते. मूर्ती हे फक्त एकाग्रेतसाठी लागणारे प्रतीक आहे. स्वामी विवेकानंदांची एक कहाणी प्रसिद्ध आहे. ते एका राजाच्या राजवाड्यावर गेले होते. स्वामीजींची वृत्ती मात्र अशी की आपण वनात, एखाद्या गरिबाच्या झोपडीत अथवा राजसदनात कोठेही असो सर्व समानच. तेथे त्या राजाचे दिवाणजी स्वामीजींशी चर्चा करत होते. दिवाणजी

२२३