पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भरावे' अशा म्हणी सहज प्रचलित होत्या. तत्त्वज्ञानाप्रमाणे मनुष्याला पूर्वकर्मांचे फळ मिळते. पापकर्माचे फळ वाईट व सत्कर्मांचे फळ गोड, सुखदायी असे असते.तुम्हाला आजचा जन्म आहे तसा का मिळाला? तर हे सुकृताचे फळ, असे समजले जात आहे. यात काहीही सत्य नाही असे विज्ञानवाद्यांचे म्हणणे. इतरांनी पिळवणूक करण्यासाठी या संकल्पनेचा वापर केला गेला आहे. उत्तम रक्त म्हणजे उत्तम प्रकृती व विकार म्हणजे अशुद्ध रक्त ही संकल्पना पाश्चात्य लोकांत प्रचलित होती.दोष रक्ताचा, पंधराव्या शतकाच्या द्वितीयार्धात सिफिलिससारख्या रोगाने युरोप व एशियात थैमान घातले होते. तसेच देवी या रोगाची साथ ही नेहमी यावयाची व त्याचे कारणही अशुद्ध रक्त असे युरोपमध्ये समजले जाई. आणि रक्त अशुद्ध होते तर ते नीतिमत्ता व ईश्वरी नियम हे न पाळल्याने. नंतर जसजसे नवीन शोध लागत गेले तसतसे आधुनिक ज्ञान प्राप्त झाले, आणि रक्ताची चाचणी अतिशय महत्त्वाची झाली आहे. याच्या निरनिराळ्या कारणांसाठी निरनिराळ्या तपासण्या अस्तित्वात आहेत. शुद्ध रक्तच आरोग्याला हितकारक हे सिद्ध झाले. रक्त अशुद्ध होण्याची कारणे म्हणजे जंतुसंसर्ग. तेव्हा प्राचीन कालातील संकल्पना भले शास्त्रावर आधारित नसतील पण त्यांना असत्य, पुराणातील वांगी असे म्हणता येणार नाही. ह्याला पूर्वकर्मे जबाबदार होती ही भारतीय संकल्पना व नीतिमत्ता ढासळल्यामुळे होणारा विकारांचा उद्भव हा अशुद्ध रक्तामुळे होत असतो, ही युरोपमधील संकल्पना एकच आहे. योग्य काळी विवाह करून जन्माच्या जोडीदाराबरोबर लैंगिक सुख घेणे हे नीतीचे काम आणि बाहेरख्यालीपणा हे अनीतीचे काम. लैंगिक रोग हे निश्चितच हा प्रकारामध्ये मोडतात. आधुनिक 'एड्स' हा रोगही अनीतीचे वर्तन व रक्त अशुद्ध होणे यातूनच होत असतो. यालाच तत्त्वज्ञानी लोकांनी दिलेले रूप म्हणजे रक्तातील पेशी आपणाशी संभाषण करत असतात. शास्त्रीय दृष्ट्या मेंदूचे टिश्यू व रक्तपेशी यांचे सातत्याने एकमेकांत संभाषण चालू असते हे सत्य आहे. इकडे लक्ष न दिल्यास विकार होतात. विकार म्हणजे देहाचा विलाप जो दुःखावाटे प्रगट होत असतो.

आतला आवाज:

 महात्मा गांधी म्हणावयाचे की आपला 'आतला आवाज' अनेक गोष्टी सांगत असतो. त्यांच्या जीवनात सामान्य लोकांनी या भावनेची टिंगलटवाळीच केली.

१७