पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वा धंद्यात जर समाधान (Job Satisfaction), आनंद मिळत नसेल, त्या व्यक्तीला नाइलाज म्हणून ते काम करावे लागत असेल तर त्यांना 'रक्तवाहिन्यांत तुंबा' घेण्याचा विकार होण्याची शक्यता फार मोठी असते. यावर उपाय म्हणन आधुनिक वैद्यक फक्त औषधोपचार करते. १९८० साली ज्या व्यक्तींना 'ॲथिरोस्क्लेरॉसिसचा विकार होता त्यांना 'ध्यानधारणा करण्यास शिकवण्यात आले. आहारात बदल, व्यायाम या गोष्टींचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. पाहणीत असे आढळून आले की यामुळे रक्तातील कोलेस्टरॉलची पातळी वीस टक्क्यांनी खाली आली. हे यश तसे सर्वसाधारण होते परंतु किल्ली शोधायला निदान काही कवडसे खोलीत पडले. थोडा भारतीय तत्त्वज्ञानानुसार विचार आपण नंतर करू आणि तो मात्र मूळ अंधारी खोली प्रकाशाने पूर्ण उजळून टाकेल.
 अनुभव काही कठीण प्रश्न उपस्थित करतात. कामधंद्यातील समाधान, जीवनातील आनंद, ध्यानधारणा, हे काही प्रत्यक्ष अस्तित्वात असलेले पदार्थ नाहीत. औषध म्हणजे एक जडपदार्थ. याचा अणू शरीराच्या अणूपर्यंत सहज पोहोचू शकतो हे शास्त्रीय सत्य आहे. पण चांगल्या भावभावना शरीरातील पेशीला कशा पोहोचतात? औषधोपचार म्हणजे अत्यंत महागडी, आजकाल परवडेनाशी झालेली पद्धत. आणि ध्यानधारणेसारख्या आध्यात्मिक गोष्टींना एकही पैसा पडत नाही; हॉस्पिटल, प्रयोगशाळा अशा मोठमोठ्या इमारतीही लागत नाहीत. घरच्या घरी, अगदी एका खोलीतही ही साधना करता येते. मग त्यामुळे १९८० मधील प्रयोगांना थोडेसे यश येऊन त्या रुग्णांची कोलेस्टरॉची पातळी २०% खाली आली होती ती ९०% किंवा ८०% पर्यंत खाली आणणे का शक्य होऊ नये? कोठल्याची यंत्राची कार्यक्षमता जर ७०% ते ८०% असेल तर कार्यशक्ती उत्तम म्हटली जाते. या विश्वात १००% परिपूर्ण काहीच नाही म्हणून कोलेस्टरॉल लेव्हल या आध्यात्मिक मार्गाने १००% खाली आणणे हे स्वप्नरंजन समजले गेले तर त्यात गैर असे काही म्हणता येणार नाही. शरीर-मन-संबंध अंशतः तरी समजण्याचा मार्ग अंधूकपणे का होईना पण आपणास दिसू लागला आहे.
 वैद्यकशास्त्राला हे अलीकडे कळले आहे की ध्यानधारणेमुळे रक्तातील कॅटेकोलामाईन्सची (Catecholamines) पातळी खाली आणता येते. (कॅटेकोलामाईन्स म्हणजे डोपामाईन, एपीनेफाईनसारखे स्राव) ॲड्रेनलिनची १५०