पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानवजातीसाठी केली गेलेली प्रार्थना. परंतु निरोगी व रुग्ण यांपैकी कोणाला जास्त फायदा होतो? ह्यासाठी वरील प्रयोगाप्रमाणेच कीड लागलेल्या राय धान्यावर प्रयोग करण्यात आला. यासाठी त्या संशोधकांनी ह्या बिया मीठ मिसळून केलेल्या खाया पाण्यात घातल्या. बाकी प्रयोग तोच. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी प्रार्थना hi होती, त्या बियांना भरपूर मोड आले. मूळ प्रयोगातील रसायन तेच होते. परंतु मीठ मिसळल्यामुळे त्याची शक्ती कमी झाली होती. यापुढे हा खारटपणा वाढवून परत प्रयोग केला तेव्हाही उत्तम गुण आलाच. सर्वसाधारणपणे इतक्या क्षारयुक्त जमिनीत हे बी उगवणे फारच कठीण. हा प्रयोग असे दर्शवतो की, मनापासून केलेली प्रार्थना खूप गुण देऊ शकते. म्हणजेच मन हे देहातच स्थित नसून ते वैश्विक स्तरावर पसरलेले आहे. वैयक्तिक मन हे शेवटी त्या वैश्विक मनाचाच एक भाग आहे, एक छोटेसे रूप आहे.

  यापुढची पायरी म्हणजे स्पिनड्रिफ्ट या संस्थेने पुढे केलेले संशोधन. प्रश्न असा की काही जणांच्या अंगात ही शक्ती जास्त व काही जणांच्या अंगी कमी असू शकते का? यातही त्यांना असे आढळले की अनुभवी, दीर्घकाळ प्रार्थना करणाऱ्या लोकांना अननुभवी व नवीन साधकांपेक्षा जास्त यश लाभते. तसेच दीर्घकाळ केलेली प्रार्थना कमी काळ केलेल्या प्रार्थनेपेक्षा जास्त गुण देते का? यांनी "X", "Y" व "Z” अशी खूण केलेली तीन भांडी घेतली. त्यातील "X" व "Y" या भांड्यांतील बीजांसाठी एक विशिष्ट काळ प्रार्थना केली व नंतर "Y" व "Z" या भांड्यांतील बीजांसाठी तितकाच काळ प्रार्थना केली. प्रयोगाच्या शेवटी असा अनुभव आला की "Y" भांड्यातील बांसाठी दुप्पट काळ प्रार्थना झाली होती व यशही त्याच प्रमाणात आले होते. "Y" पात्रातील बीजांना "X" किंवा "Z" पात्रांतील बीजांपेक्षा दुप्पट अंकुर आले होते. पुढचा प्रश्न जो त्यांनी हाती घेतला तो म्हणजे काही उद्देशाने केलेली प्रार्थना व काहीही उद्देश न ठेवून केलेली प्रार्थना यामध्ये जास्त फलदायी कोणती? त्यांना असे आढळून आले की विशिष्ट उद्देशाने केलेली प्रार्थना निरुद्देश केलेल्या प्रार्थनेपेक्षा जास्त फलदायी होते. असे अनंत प्रयोग या संशोधकांनी केले. तेव्हा त्यांनाही प्रार्थनेमध्ये अशी काही शक्ती आहे की जी विज्ञानाच्या नियमांत न मानल्या जाणाऱ्या, सर्वसामान्य लोकांचा विश्वासही बसणार नाही, अशा गोष्टी सहज प्राप्त करून घेऊ शकते हे समजले. प्रार्थना केव्हा निरुद्देश करावी व केव्हा एखादी व्यक्ती

१०४