पान:आरोग्यशास्त्र.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण ४३ अमोनिआ:- अमोनिआ व त्याचीं नमकें ( साल्ट्स् ) अल्प प्रमाणांत वातावरणांत नेहमीं सांपडतात. प्राणिज पदार्थ कुजण्यामुळे हा उत्पन्न होतो. पावसाची सर येऊन गेल्यावर हवेंतील याचें प्रमाण कमी होतें. तो पाण्यांत विरघळतो. वनस्पतींना लागणाऱ्या नैट्रोजन पैकीं कांहीं अंश अमोनिआपासून मिळतो. आतां आपण शहरांतील परंतु इमारतीचे बाहेरील हवेचा विचार करूं. जेव्हां हवा कोंदट होऊन वारा वाहणें बंद होतें तेव्हां हवेंतील प्राणवायूचें प्रमाण १८/१९ पर्यंत येतें. कर्बानिक अॅसिडचे प्रमाण ०.०६ पर्यंत वाढ. शहरांतील उंच उंच इमारतींमुळे हवा खेळत नाहीं. विहिरीतील कुंद हवेप्रमाणे शहरांतील हवेची स्थिती होते. इमारतींमध्यें वायुसंचार केला, अमुक मापापेक्षां घरें उंच नसावीत व घरांच्या पाठी एकमेकांला लागतील अशीं तीं बांबू नयेत, असा निबंध घातला व ड्रेनेज चांगले बांधलें तर शहरांची हवा पुष्कळ सुधा- रते. तरीपण खुल्या मैदानांतच्या हवेपेक्षां ती पुष्कळ अशुद्ध व कांहींशी अपायकारक असते. प्राणिज व उद्भिज तरंगत्या परमाणूंनी हवा अधिक अशुद्ध होते. रस्त्यांतील धुरळा, धूर, खनिज द्रव्यें, प्राणिज व उद्भिज द्रव्यें, फुलांचे पराग, थोडे व फार अपायकारक सूक्ष्म जंतु इत्यादि पदार्थ हवेंत असतात. उंच डोंगरावरील व समुद्रावरील शुद्ध हवेंत हे नसतात. वातावरण दूषित होण्याची कारणेंः - (१) मनुष्यप्राणी व जनावरांचें श्वासोच्छ्रासन. (२) लाकूड, कोळसा, धूर, इत्यादिकांचें ज्वलन. (३) प्राणिज व उद्भिज पदार्थ सडणें व कुजणें. (४) कारखाने व किरकोळ हात मशागतीचे धंदे. श्वासोच्छ्रासानें झालेली हवेची सदोषता प्रौढ वयांत दर मिनिटांत सरासरीने अठरा वेळा श्वासोच्छ्राप होतो. ह्या दर वेळीं सुमारें ३० ५ घन इंच हवा फुप्फुसाचे आंतबाहेर जाते.