पान:आरोग्यशास्त्र.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ आरोग्यशास्त्र सांथ असलेल्या जागेंतील लीद, चघळ वगैरे वरचेवर काढून जाळावें. मेलेली जनावरें कातड्यांसह निदान सहा फूट खोल व दूर अंतरावर व इतर जनावरांचा रिघाव न होईल अशा जागीं चुन्यांत पुरावीं; अथवा तीं जाळून टाकावी. अशा जनावरांची उत्तरक्रिया करतांना मुख, नासिकादि नैसर्गिक छिद्रांत जंतुनाशक द्रव्यांनीं युक्त दट्टे घालावे व चर्माला ओरखडा किंवा जखमा पडूं देऊं नयेत. दूषित जागेवर ताजा भाजलेला चुना किंवा दुसरें एखादें दुर्गंधिनाशक द्रव्य पसरावें. नंतर दर शेर चुन्याचे निवळींत -२ तोळे क्लोरैंड ऑफ लैम किंवा ५ तोळे बाजारी कॅबॉलिक ऍसिड घालून त्यानें सफेती द्यावी. पशुपक्षांतील टबर्क्युलोसिस ह्या आजारांत मिलेटचे दाण्याचे आकाराचे व बहुधा कठीण व साधा- रण पारदर्शक व भोवतालचे भागापासून सुटून लहान ग्रंथींची उत्पत्ति होणें ही प्रमुख भावना असते. गुरेढोरें, डुक्कर व पक्षी ह्यांत हा आजार पुष्कळसा होतो. परंतु कधीं कधीं इतर सर्वउष्णरक्त प्राण्यांत होतो. गुराढोरांत ह्या रोगाच्या भावना सौम्य स्वरूपांत व मंदतेनें सुरू • होतात. त्या अशाः - शुष्क, हस्व व हिसक्याचा खोकला व छातीचे स्पर्शज्ञानाची वृद्धि, पुढील अवस्थेत कोरड्या खोकल्याच्या उबळी, त्या • विशेषतः सकाळीं ज्यास्त असणें, मर्यादित भागांत बदबदित ध्वनी, मान व डोकें हीं लांब केल्यामुळे दिसून येणारा कष्टश्वास, दुग्धोत्पत्तीचें नूनत्व, पोटफुगी, पोटदुखी आणि अतिसार व मलावरोध पाळीपाळीनें होणें, रक्तमूत्र, ग्रंथींची वृद्धि, अनियमित ज्वर अतिकृशता, क्षीणता, कधीं कधीं " , पेरिटोनियमची सूज, अस्थींची व सांध्यांची सूज ह्या भावना होतात. जनावरांना मद येऊन तो बराच काळ टिकतो. गाई दुसऱ्यांवर चढतात पण बैलाकडून गाभण होत नाहींत. गाभण गाईचा गर्भपात होतो. मेंदू