पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०

नफा शुद्ध सोन्यापेक्षां अधिक मौल्यवान; विद्या माणिकापेक्षां मौल्यवान् . ज्या ज्या गोष्टींची माणसांस वासना असते त्या त्या गोष्टी तिच्या बरोबर तुलनेस योग्य नाहींत. उदंड आयुष्य ज्ञानदेवतेच्या उजव्या हातांत; मान आणि अखंड संपत्ति डाव्या हातांत. तिच्या चालीरीती सौख्यखरूपी; तिचे मार्ग शांतिप्रदे.
 आणखी–ज्ञान हीच मुख्य गोष्ट होय; ह्मणून, विद्यार्जन करा. इतर गोष्टी मिळवूनही समज मिळवा.
 इतके असून बहुकालपर्यंत लोकमत शिक्षणाविरुद्ध होतें. मुख्यत्वेंकरून मुलींच्या शिक्षणाविरुद्ध. जर्मन भाषेत एक ह्मण होती, ती अशी-" बायकांचें पुस्तकालय ह्मणजे कपड्याल - त्याचें कपाट.” फ्रेंच भाषेत दुसरी एक ह्मण होती- "मुलींस चार शुभवर्तमान प्रगट करणारांची ओळख करून द्या; अथवा चार भिंतींच्या आंत कोंडून ठेवा. " अगदीं गरीब लोक किंवा सभ्य ह्मणवून घेणारे लोक ह्या दोघांचेंही शिक्षणाशी कर्तव्य नाहीं असें मत आज काल होतें. शिक्षणाशी फक्त धर्मो- पदेशक, योगी, संन्याशी ह्यांचें कर्तव्य असें लोक मानीत. क्लार्क ह्या शब्दाचा अर्थच तो.
 डॉ॰ जॉनसनसारख्या भल्या व समजूतदार माणसानें सिद्ध कृत्याप्रमाणें ठरवून 'ठेविलें होतें कीं, "प्रत्येकानें शिकण्याचें केलें तर लोकांची हेलपाटी करण्यास कोणी माणूस सांपडावयाचा नाहीं.” डॉ० जॉनसन भाषाज्ञानामध्यें अधिकारी माणूस होता, आणि ह्मणून शारीरिक श्रमाचें महत्व व योग्यता त्याला क- ळली नव्हती.
 ही एक पायरी. व्यावहारिक ज्ञानासंबंधींच शिक्षण असावें


१ प्रॉव्हर्न्स.