Jump to content

पान:आमची संस्कृती.pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८८ / आमची संस्कृती

आखलेले असे नसत, हे केतकरांनी ‘मृच्छकटिक' नाटकांतील उदाहरणे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.*
 ह्याच पुस्तकाच्या एका प्रकरणात चातुर्वण्र्याच्या बुडाशी हिंदूचे तत्त्वज्ञान काय आहे ह्याचेही डॉ. केतकरांनी विवेचन केले आहे. कर्म, कर्मफल, पुनर्जन्म इत्यादी कल्पनांमुळे हिंदूंना, विशेषत: ब्राह्मणांना आपण खालील जातींवर अन्याय करीत आहो अशी भावना नसे, व शूद्रांना आपण हीन जन्मास येऊन मागील जन्मीचे कर्मफल भोगीत आहो असे वाटून आपणांवर होणाच्या अन्यायाची जाणीव नसे, असे केतकरांनी प्रतिपादिले आहे. पण ह्या तत्त्वज्ञानामुळे चातुर्वण्र्याची उभारणी झाली असे म्हणता येणार नाही. समाजसंस्थांचा उगम प्रथम व त्यांना जुळणाच्या तत्त्वज्ञानाची उभारणी नंतर, ह्या समाजशास्त्रातील अगदी साध्या तत्त्वाकडे केतकरांनी दुर्लक्ष केले होते असे दिसते. भारतीयांचा इतिहास पाहिला तर तेथे जातीजातीतील स्पर्धा व अन्यायाची जाणीव अगदीच नव्हती, असे दिसून येत नाही. ह्या स्पर्धेचा व असूयेचा बुद्धाने चांगला फायदा घेतला, हे विधान डॉ. केतकरानाच आपल्या निरनिराळ्या ग्रंथातून जागजागी केले आहे.
 ह्या ग्रंथातील वैशिष्ट्य म्हणजे हिंदू संस्कृतीसंबंधी केतकराचा भूमिका हे होय. सर्व ग्रंथ अमेरिकेतील मध्य स्थितीतील शिकलेल्या लोकांना उद्देशून लिहिल्यासारखा असून त्यांत जागोजाग हिंदूच्या समाजव्यवस्थेचे अर्धवट समर्थन आणि ती रानटी असल्याबद्दलची अर्धवट मान्यता दिलेली आढळते. एवढेच नव्हे, तर जातिसंस्था हा हिंदू

 ‘पण मृच्छकटिकांतील राजा आदर्शभूत राजा होता, असा त्याचा नाटकात कोठेच उल्लेख नाही. एवढेच नव्हे, तर तो क्षत्रिय तरी होता की नाही ह्यास शंका येते. ह्या नाटकात क्षुद्र सेनापतीचा जो उल्लेख आहे तो तर उघड विंदागर्भ व राजाची अव्यवस्था दर्शविणारा आहे.(चंदनकवीरक-संवाद पा९ मच्छकटिक, अं.६, श्लो.२२/२३) आणि तो केतकरांनी शूद्रास उच्च जा मिळत असत, ह्या विधानांच्या पुष्ट्यर्थ द्यावा ह्याचे आश्चर्य वाटते. उलट निरनिराळ्या जातींनी करावयाचे धंदे व त्यांचे चातुर्वण्र्यातील स्थान ठरलेले अस हे पंचतंत्रातील सेनापती झालेल्या कुंभाराच्या गोष्टीवरून चांगलेच दृष्टोपत्तीस येते
(पंचतंत्र ४, कथा ३).