पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहाराचे घटक- १

मिळते, परंतु ते अशा रीतने घेण्यापेंक्षा समुदांतील मासे खाऊन मिळवावे, कारण ओंषधाच्या स्वरूपात त्याचा अतिरेक होण्याचा संभव असतो.

 गंधक हा मुख्यतः प्राणीजन्य प्रोटीनमध्ये असतो, तेव्हा प्राणिजन्य प्रोटीन न खाल्ल्यास तो पुरेसा मिळत नाही.

 पोटॅसिअम. हे शाकाहारात फाजील प्रमाणांत असते आणि सोडिअम पुरेसे नसते. अन्नात कांही मीठ घातल्याने हे प्रमाण दुरुस्त होते.

 मॅग्नीसिअम. याचीही शरीरास जरूर असते. ज्यां अन्नात कँल्सिअम असते त्यांतच बहुधा हेही सांपडते, आणि शिवाय ते हिरव्या रंगाच्या पानांत असते. विड्याच्या पानाचा हा एक उपयोग असतो, कारण पुष्कळ लोक त्याच्याशिवाय कसलेही हिरवे पान कच्चे खात नाहीत. मिश्र आहारात पोटॅसिअम व मॅग्नीसिअम् बहुधा कमी पडत नाहीत.

 मँगैनीज या धातूने प्रजोत्पत्ति, दुग्धोत्पत्ति, आणि शरीराची वाढ यांना मदत होते. धान्यांचे टरफलात हा असतो व ते काढून टाकल्यास तो कमी पडतो.

 लोह रक्तात असते, याकरतां अन्नात भरपूर लोह नसल्यास मनुष्य फिकट दिसेल. दुधात पुरेसे लोह नसते, यामुळे नुसत्या दुधावर वाढवलेले मूल फिकट दिसते. डाळी, कोंड्यासह धान्ये, हिरव्या पालेभाज्या, अंडी व मांस यांत लोह पुष्कळ असते.

 तांबे . रक्ताच्या तांबड्या भागांत हेही अल्प प्रमाणात असते,परंतु प्रमाण जास्त आल्यास ते विष आहे. उपजतांना मुलाच्या पित्ताशयांत तांबें व लोह यांचा संग्रह असतो, परंतु कॅल्सिअम पुरेसे नसते. या वेळी मुलाची हाडे मऊ असतात, व ती तशी नसल्यास उपजतांना आईला व मुलालाही त्रास होईल परंतु नंतर हाडे कठिण होण्याकरतां कॅल्सिअमची व फॉस्फरसची जरूर असते व याकरतां वाढीच्या वयांत मुलांना भरपूर दूध मिळणे जरूर असते.
 एकंदरीत दुध, अंडी, हिरव्या पालेभाज्या, समुदातील मासे, आणि टरफल न काढलेली धान्ये, इतके पदार्थ खाल्ल्यास अन्नात खनिजद्र्व्याची कमतरता पडणार नाही.

----------
३१