पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आपण जिवंत कसे राहतो?


घटक बनू शकतील तेच आपले अन्न म्हणण्यात योग्य होत. रासायनिक दृष्टया पाच प्रकारची द्रव्ये आपल्या शरीरास अन्नांतून मिळावी लागतात.
 १ला प्रकार म्हणजे ‘प्रोटीन.’ यांत मुख्यत: कार्बन(कोळसा) हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नैट्रोजन ही मूलद्रव्ये असतात, व शिवाय कधीकधी फॉंस्फरस व गंधक हीही असतात. तथापि सर्व प्रकारच्या प्रोटीनमध्ये नैट्रोजनचें प्रमाण सुमारे शेकडा १६ टक्के असते. प्रोटोंनच्या प्रत्येक प्रकारात एक किंवा अधिक ‘अँमोंनो अॅसिड’ नांवाचे पदार्थ असतात आणि प्रत्येक प्रोटीनमध्ये ही ‘अँमोंनो अॅसिडे’ किती व कोणती असतात यावर त्याची अन्नाच्या दृष्टीने किंमत ठरते. अन्नातील या घटकांचे साह्याने शरीराची झीज भरून निघते आणि वाढीच्या वयांत शरीराची वाढ होते. यांचे अधिक वर्णन पुढे येईल.

 २ रा प्रकार म्हणजे `कार्बोहायड्रेट’.या पदार्थात मुख्य घटक म्हणजे कार्बन, हायड्रोजन व आँक्सिजन हे असतात,हे पदार्थ शरीराच्या घटनेला किंवा डागडुजीला उपयोगी नसतात,परंतु शरीराच्या सर्व हालचालीस शक्ति यांपासून मिळते.

 ३ रा प्रकार म्हणजे तेल, तूप, वगैरे वनस्पतिजन्य किंवा प्राणिजन्य चरबी. यांतही कार्बोहायड्रेटप्रमाणे कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन हेच पदार्थ असतात, परंतु कार्बोहायड्रेट्मध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन हे दोन पदार्थ रासायनिक रीतीने एकत्र होऊन त्यांचे पाणी बनलेले असते, तसे येथे नसते. चरबीचा उपयांग म्हणजेशरीरांत जळून उष्णता उत्पन्न करणे. कार्बोहायड्रेटपासूनहि उष्णता उत्पन्न होते. परंतु चरबीपासून जास्त होते.
  ४ था प्रकार म्हणजे पाणी. शरीराचा दोनतृतीयांश भाग पाणी असते, दररोज मल,मूत्र.घाम व उच्छवास यांचेद्वारा शरीरातून सुमारे २५००ग्रॅम् (४५३ ग्रॅम म्हणजे१ पौंड)इतके पाणी बाहेर जाते, व तितकेच खाद्यपेयांचे द्वारा शरीरांत येते. शरीराला पाण्याचे महत्त्व अतिशय आहे. शरीरातील सर्व द्र्व

२१