पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुष्याचा आहार

६० पेक्षाही अधिक दिवस जगू शकतो असे ग्हणतात.आणि या सहनशक्तींमुळेच मनुष्य आजअनेकप्रकारचीं विषें सेवन करूनही जगला आहे.अशा स्थितींतही कांही माणसे १५०, २००, ३०० वर्षेपयेत जगल्याचीं उदाहरणे आहेत असे मेंचनिकोफ् ने लिहिले आहे. थॉमस पार नावाचा इंग्लंडातील शेतकरी,पहिल्या चार्ल्स राजाच्या दरबारी त्याला दिलेल्या मेजवळानीच्या वेळी अजीर्ण होऊन १६३५ साली, आपल्या वयाच्या १५२ व्या वर्षी मेला आणि प्रसिद्ध डाक्तर हार्वे यांनी त्यांचे शरीर कापून पाहतां त्यांस त्याची अंतरिंद्रियें तरुण माणसासारखी सुस्थितीत असलेली आढळला. अशी माणसे अर्थातच क्वचित सापडतात आणि सामान्य नियम म्हटला म्हणजे या काळांत मनुष्याचे शरीर इतके कुरूप झाले आहे की वस्त्रे वापरण्याची चाल कितीही हानिकारक असली तरी ती बरी म्हणण्याची वेळ आली आहे, कारण पाहण्याच्या लायकीचे शरीर फारच क्वचित असते. मनुष्याची प्रकृति इतकी खालावली आहे की बालमृत्यूंचे प्रमाण अतोनात वाढले आहे, आणि त्यांतून जे जगतात त्यांतीलही बरेच लोक कसेतरी जगतात इतकेच. त्यांचे शरीर यथातथाच असते आणि त्यांच्या अगांत कोणत्याही प्रकारची धमक नसते. लढाईकरतां सैन्यात भरती करतांना शेकडा ५५ ते ६० लोक वाईट प्रकृतीमुळे नाकाराने लागतात, अशी स्थिति फ्रान्समध्ये आहे. एक फ्रेंच लेखक ग्हणतो की १८९४ साली फ्रान्समध्ये ४५६००० मुलगे जन्मले. नंतरच्या वीस वर्षांत यांपैकी ११८००० मेले, म्हणजे शेकडा २७.तेव्हा सक्तींच्या लष्करी नोकरी करतां जे बाकीचे लोक २१ व्या वर्षी आले, त्यांपैकी शेकडा ६० टाकाऊ ठरले! तेव्हा एकंदर हिशेब करतां फक्त शेकडा ३० लोक लढण्यास योग्य ठरले. ही संपन्न देशांतील स्थिति, आणि हिंदुस्थानांत तर सर्वांना धड खायला देखील मिळत नाही हे प्रसिद्धच आहे.
 मनुष्याचीं एकंदरीने अवनति झाल्यामुळेच जरा थंडी पडली की त्याला शेकत बसावे लागते, गरम कपडे, गरम पेये, गरम स्नान, वगैरेंची जरूरी पडते आणि रोगजंतूंशी तर बिलकूल सामना करवत नाही, यामुळेच क्षयासारखे रोग फैलावतात. अन्नाच्या कृत्रिमतेने जें नुकसान होतें, तें इतर कोणत्याही प्रकारच्या

१७