Jump to content

पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बोरकरांच्या कवितेप्रमाणे माझे थकले मागणे, तुझे सरे ना रे दान असे शशीप्रति म्हणून माझे लिहिणे इथेच थांबवितो." पती आणि पत्नी ही संसाररथाची दोन चाके आहेत, असे नेहमी म्हटले जाते. त्याची सार्थता शशिकलाताई आणि रावसाहेबांकडे पाहिल्यावर लगेच पटते. 'आम्ही साहित्यिक माणसांच्या मुद्रा टिपतो' हा महाराष्ट्र - वाल्मीकी ग. दि. माडगूळकरांचा दावा निदान या बाबतीत तरी खरा ठरला आहे - शशिकलाताई म्हणजे खरोखरच आहे देणे भगवंताचे. ■ - अजुनी चालतोची वाट... ३२०