पान:अग्निमांद्य.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ar पोषण होत नाहीं. कधीं कधीं हे क्षार सांध्यांत जमतात व त्यामुळे सांधे धरतात व दुखू लागतात. ताक नेहमीं घेतल्यानें हे क्षर हळु हळु वितळून जाऊन लवीवाटे निघून जातात, व त्यामुळे उतारवयाची झांक लवकर येत नाहीं; किंवा अकालीं आलेली असली तर नाहींशी होते. त्याचप्रमाणें सांधे नरम पडून बरे होतात. मूत्रपिंडावर परिणाम होऊन मूत्र साफ होतें. त्यामुळे तमांसांतील दोष निघून जातात. तसेंच यानें सर्व अन्नमार्ग साफ होऊन त्याची पचनक्रिया उत्तम रीतीनें चालू लागते; भूक वाढते; शौचास साफ होतें; झोंप चांगली लागते आणि यकृत् व दुसरी पचनेंद्रियें आपापलीं कामें उत्तम रीतींनीं करूं लागतात. यावरून आपल्या अन्नांत प्राचीनकाळापासून चालू असलेल्या ताकाचे गुण किती चांगले आहेत हें पाहिलें म्हणजे आपल्या पूर्वजांची बुद्धि किती चौकस होती याचें अनुमान होतें. शेवटीं एक गोष्ट सांगावयाची राहिली ती ही कीं, कोणत्याही माणसानें, तो विवाहाला योग्य होऊन गृहस्थाश्रम पत्करल्यावर त्याची आपल्या सहधर्मचारिणीशीं गैांठ पडेतोंपर्यंत त्यानें त्रंह्मचर्यानें वागण्याची खबरदारी घेतली पाहिजे. कारण, त्यापूर्वी स्त्रीविषयक विचारांस मनांत १ आपल्या प्राचीन चरकसुश्रुतादि वैद्यक ग्रंथांत स्त्रीपुरुषसमागमासंबंधानें अनुक्रमें सोळा व पंचवीस वर्षांची मर्यादा सांगितली आहे. आतां ही मयोदिा अलीकडे आयुर्मर्यादा कमी झाल्याकारणानें कांहीं लोकांना जरी पाळतां येत नसली - तरीं त्यांनीं ती निदान वाग्भटकारांनीं सांगितल्याप्रमाणें ह्मणजे वीस वर्षांचा पुरुष व सोळा वर्षांची स्त्री याप्रमाणें तरी राखण्याचा प्रयत्न करावा. मात्र ही जी मर्यादा सांगितली ती निरोगी ख्रिपुरुषांना आहे हें लक्षांत ठेवावें. २ स्मरणं कीर्तनं केलिः प्रेक्षणं गुह्यभाषणम् । संकल्पोऽध्यवसायश्च क्रियानिर्वृत्तिरेव च ॥ एतन्मैथुनमष्टाङ्गं प्रवदन्ति मनीषिणः । विपरीतं ब्रह्मचर्यमेतदेवाष्टलक्षणम् ॥ दक्षस्मृति.