चर्चा:भोंडल्याची गाणी

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून

भोंडला किंवा हादगा हा पश्चिम महाराष्ट्रातकोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. हा खेळ भोंडला या नावानेही ओळखला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.

साचा:विकिकरण

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे
करीन तुझी सेवा...

अशी गाणी गात शेवटी ...आडात पडला शिंपला,
आमचा भोंडला संपला!



१) ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडिला करी तुझी सेवा, माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी

२) अक्कण माती चिक्कण माती

३) एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू

४) सासुऱ्याच्या वाटे कुचकुच काटे आज कोण पाहुणं आलं गं बाई आलं ग बाई

५) कार्ल्याचा वेल लाव ग सुने लाव ग सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा ६. अडकित जाऊ,खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता..

७‌ श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं...

८.आला माझ्या माहेरचा वैद्य...

९. राधा रुसली सुंदरी...

१०‌सासुबाई ,सासुबाई मला मूळ आलं ,धाडता का,धाडता का..?

११. हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली... ८. आणा माझ्या माहेरचा वैद्य याची सुरुवात बहुतेक एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला अशी आहे.

१२. कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं ?

१३. अरडी गं बाई परडी, परडी एव्हढे काय गं, परडी एव्हढे मूळ गं, दारी मूल कोण गं ?

सुरुवातीला दागिने आणलेले असायचे. मग जसे मिक्सर, फीज, वॉशिंग मशीन घरोघरी यायला लागले तसे दागिन्यांना कोणी किंमत देईनासे झाले. शेवटी मात्र नवऱ्याकडून मंगळसूत्र कायम राहिले. सध्या तेही बदलले असल्यास कल्पना नाही.

१४. नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंकाळ्यातलं/शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी
तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी....
आता माझा दादा येईलग येईलग
दादाच्या मांडीवर बसीनग/बसेनग
दादा तुझी बायको चोरटी चोरटी
असू दे माझी चोरटी चोरटी
दे काठी लाबं पाठी विसल्या गुलाबाई माहेरच्या गोष्टी

१५. शिवाजी आमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
विहिरीमधे सात कमळे
एक एक कमळ तोडिलं
भवानी मातेला अर्पण केलं
भवानी माता प्रसन्न झाली
शिवाजी राजाला तलवार दिली
तलवाऽऽरंऽऽ घेऊनी आला
हिंदूंचाऽऽ राजा तो झाला

१६. कृष्णा घालितो लोळण, यशोदा आली ती धावून
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

१७) कारल्याचे वेल लावग सुने लावग सुने, मग जा आपल्या माहेरा माहेरा.. कारल्याचे वेल लावल हो सासूबाई, लावल हो सासूबाई अता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा

ऐलमा पैलमा[संपादन]

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवे घुमती बुरजावरी
गुंजावाणी डोळ्यांच्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी नायका
एवि निघा, तेवी निघा, कांडा तीळ, बाई तांदुळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया खातील का दुधोंडे
दुधोंड्याची लागली टाळी, आयुष्य दे बा वनमाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येताजाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आळव्या लोंबी
आळव्या लोंबती अंगणी, आळव्या तुझी सात कणसं
भोंडल्या तुझी सोळा वर्षं
अतूला मतूला चरणी घातुला, चरणीचे सोंडे
हातपाय खणखणीत गोंडे
एक एक गोंडा विसाविसाचा
साडे नांगर नेसायाचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो
वरीस वर्ष पावल्यांनो.

पाठभेद[संपादन]

डॉ. सरोजिनी बाबर ह्यंनी संपादित केलेले 'भोंडला-भुलाबाई' नावाचे पुस्तक महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीने १९७९ साली प्रकाशित केले होते. त्यात ह्या गाण्याचे बरेच पाठभेद दिले आहेत. जिथे तुम्ही दिलेल्या ओळींपेक्षा वेगळ्या ओळी दिसल्या त्याच फक्त उद्धृत करतो[१]साचा:मृत दुवा :

1.पारवणी बाळाचे गुंजावाणी डोळे
गुंजावाणी डोळ्यांच्या गुंफिल्या टिक्का
2.एवीन गाय तेवीन गाय
कांडा तीळ बाई तांदुळ कांडा....
...आयुष्य देरे बा माळी...
...आळव्या लोंबती अंकणा
अंकणा तुझी सात कणसं...
3.पारवाळ फकिराचे गुंजावाणी डोळे...
...थेंबोथेंबी आल्या लोंबी
आल्या लोंबी कांडूया
मोदक त्याचे बनवूया
हादग्या देवा अर्पूया
4एवी निंद्या तेवी निंद्या...
...खातील काय दुध उंडे
उंड्याशी लागली टाळी
औषढ दे रे बा माळी...
...आळ्या लोंबती आंखण (आंकण)
आंखणा तुझी सात कणसें
हातग्या तुझी सोळा वर्षे

आळव्या लोंबती अंगणी, आळव्या तुझी सात कणसं
भोंडल्या तुझी सोळा वर्षं

आळव्या लोंबती अंगणा, अंगणा तुझी सात वर्ष

एक एक गोंडा विसाविसाचा
साडे नांगर नेसायाचा

१.साड्या डांगर नेसायाचा
२.साऱ्या नांगर नेसायाचा

नेसा ग नेसा बाहुल्यांनो
वरीस वर्ष पावल्यांनो.

अडीच वर्ष पावल्यांनो.