पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
संतति-नियमन

मार्ग दाखविला आहे असें त्यांस वाटतें त्या मार्गानें ते जातही असतात. समाजांत सुप्रजा निर्माण व्हावी ही कळकळ शास्त्रकारांस आणि आर्य वैद्यकाच्या आचार्यांस होती. या त्यांच्या कळकळीस अनु- सरून त्यांना असें वाटत होतें, कीं विवाहित स्त्री-पुरुषांनीं प्रजोत्पत्ति करण्यापुरतेंच संभोगसुख घ्यावें. पण स्त्री-पुरुषांचा संभोग प्रजोत्पत्तीच्या हेतूपुरताच घडावा आणि त्या हेतूव्यतिरिक्त त्यांनीं संभोगसुखाच लालसा करूं नये असा लोकांना उपदेश केला तर पुढे असा प्रश्न साहजिकपणेंच उत्पन्न होतो की कोणत्या काळीं संभोग केला असतां गर्भधारणा होते व कोणत्या काळी होत नाहीं याविषयीं कांहीं तर्क करण्यासारखा आहे किंवा नाहीं ? तसा कांहीं शास्त्रशुद्ध तर्क बांधण्यासारखा असेल तर गर्भधारणा ज्या अवधीत शक्य नाहीं ती अवधि संभोगवर्ज्य व ज्या काळांत ती होण्याचा संभव असेल तो संभोगास योग्य समजावा, असा उपदेश विवाहित स्त्री-पुरुषांस करतां येईल. या दृष्टीनें विचार करून आमच्या वैद्यक ग्रंथांनी विहित व निषिद्ध असे संभोगकाल ठरविले होते. सुश्रुताच्या तिसऱ्या अध्यायांत -

नियतं दिवसेऽतीते संकुचत्यंबुजं यथा । ऋतौ व्यतीते नार्यास्तु योनि संवियते तथा ॥ ९ ॥

असा श्लोक आहे. त्याचा बोध असा कीं रजोदर्शनानंतर जे पहिले सोळा दिवस असतात त्या अवधींत गर्भ राहतो, पुढें राहत नाहीं, तेव्हां या वायफळ काळांत संभोग करूं नये. चरकाच्या चवथ्या अध्यायांतील सातव्या श्लोकांत व भावप्रकाशांतील शारीर प्रकरणाच्या भागांत हीच कल्पना आहे. मनुस्मृतींत देखील पतिपत्नींनीं कांहीं विशिष्ट रात्री वर्ज्य आणि कांहीं विहित समजून आचरण करावें