पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संततिनियमनासाठी ब्रह्मचर्य

४१

गोष्ट वाचकांस सांगावीशी वाटते ती ही, कीं संततिनियमनाची उघड चर्चा कोणी करूं लागल्यास या विषयाचा असा उहापोह करणें सदभिरुचीच्या विरुद्ध आहे असें म्हणून कानांत बोटे घालणारे लोकही मनांतल्या मनांत संततिनियमनास अनुकूल असतात, इतकेंच नव्हे तर आपणांस फार संतति होऊं नये यासाठी हळूच कोठून तरी माहिती मिळवून त्यांना जो उपाय पटला असेल त्या उपायाचें प्रत्यक्ष आचरणही ते करीत असतात. या बाबतींत कित्येक लोकांची संततिनियमनाविषयींची प्रतिकूलता केवळ बाहेर दाखविण्यापुरती असून त्यांच्या आचरणांत संततिनियमनाचाच प्रयत्न दिसून येतो असें आम्ही प्रत्यक्ष अवलोकनावरून खात्रीपूर्वक सांगूं शकतों. असल्या लोकांना दोष द्यावयाची आमची इच्छा नाहीं. संतति- नियमनाची इष्टता उघड कबूल करण्याचे धैर्य त्यांनी दाखविल्यास समाजाचें हित होईल, इतकेंच नव्हे तर आज गुप्त रीतीनें अर्धी- कच्ची माहिती मिळवून कोठल्या तरी अविश्वसनीय उपायाचा अव- लंब करणें जें त्यांना भाग पडत आहे तें टळून या विषयाची उघड चर्चा झाल्याने सर्वांत फलदायी व हितपरिणामी असा एखादा उपाय विद्वान लोकांच्या विचारविनिमयानें ठरेल, येवढीच आमची त्यांस विनंति आहे. संततिनियमित करण्याविषयींच्या त्यांच्या इच्छेला आम्ही दोष देत नाहीं. आज आपल्या देशांत परिस्थितिच अशी विलक्षण निर्माण झाली आहे, कीं आपल्या पोटीं फार संतति झाल्यास तिचें पालन पोषण आपल्याकडून नीट होणार नाहीं अशी चिंता प्रत्येकाला वाटणें अगढ़ीं साहजिक आहे. या चिंतेनें समाजाला इतकें ग्रासलेले आहे, की अगदी जुन्या वळणाचे आणि जुन्या मताचे लोकसुद्धां संततिनियमनाची इच्छा करतात, व या- संबंधी आपल्या जुन्या शास्त्रांत किंवा आर्य वैद्यकांत कांहीं उपाय सांगितले आहेत किंवा काय याविषयीं शोध करून त्यांत जो