पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८६ : शतपत्रे

त्या खऱ्या वाटतात. मग बाई नेम धरते की, रोज नित्य दान किंवा नित्य गोप्रदान करावयाचे आणि भटजीबाबास द्यावयाचे. असे भटजीबाबा स्वस्थ बसून काही उद्योग न करता खातात. याप्रमाणे धर्माची व्यवस्था होती. याजमुळे किती एक हजार गरीब लोक उपाशी मरतात, पण त्यांची दया कोणास येत नाही; आणि हे निरुद्योगी भट अज्ञान व आळस यांचे चौकीदार ! सर्व धन खातात.
 याप्रमाणे देऊळ बांधण्याचा मूर्खपणा आहे. याजकरिता हल्ली जे गृहस्थ असे म्हणतात की, घरी भट नित्य पंक्तीस असल्याखेरीज अन्न घेऊ नये. त्यांणीं विचार करावा आणि भटासारखे पशू होऊ नये.

♦ ♦


मद्यपान

पत्र नंबर ७६ : २३ सप्टेंबर १८४९

 अलीकडे इंग्रजी राज्य झाल्यापासून लोकांस सद्गुण लागावयाचे, एकीकडे राहून, महान भयंकर व त्वरित वृद्धी पावणारा असा एक दुर्गुण लोकांमध्ये प्रगट झाला आहे. तो कोणता म्हणाल तर दारू पिणे. पहा की, पूर्वीचे राज्यात दारू कोणी पीत नव्हते व उत्पन्नही कोणी करीत नव्हते. ब्राह्मण व मराठे राज्य करणारे. तेव्हा ते दारू उत्पन्न करणारास नीच मानीत आणि आपली झाडे त्यांजला दारू करण्यास दिली तर त्यांस बहिष्कृत करीत. आणि कोकणात अशी चाल होती की, दारू करणारा हातात दारू घेऊन जर अंगावरून गेला, तर दर्शनदोषास्तव स्नान करीत आणि दारू प्यालेला ब्राह्मण कधी आढळत नव्हता. जर कदाचित कधी कोणी पाहिला तर लोक त्यांस निंद्य मानून कधीही जातीत घेत नव्हते व ज्या गावात तो रहात असे, तेथे त्याचे फार हाल होत असत. त्याचे लग्नकार्य व्हावयाचे नाही व कोणी त्याजकडे जेवावयास जात नव्हते. असा त्याचा धिक्कार करीत असत. जर कोणी अतिशूद्रादिकांकरिता दुकान घातले तर एकीकडे छपवून चोरून घाली. परंतु तेथे कोणी बहुतकरून जात नव्हता. व भाविक लोक त्या रस्त्याने जात येत नव्हते व सरकार अशा व्यापाऱ्यापासून उत्पन्नाची आशा करीत नव्हते. म्हणून लोकांस मना करता