पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ८९


चार पैसे मिळवून पुण्यांतून जावें अशी घाअी त्यांना होणें साहजिक होतें. परंतु माझें पाहणें तसें कसें असणार ? मी केवळ पैसे मिळण्याच्या अुद्देशाने नाटक लिहिलें नाही किंवा प्रयोगाला दिलें नाही. तेव्हा माझी हौस अितकीच की नाटक चांगलें बसल्यावर मगच तें लोकांसमोर यावें. मी त्या वेळीं पुण्यांत केसरीचा संपादक, व माझें हें पहिलेंच नाटक रंगभूमीवर येणार. तेव्हा तें कसें काय येतें याविषयी मी चिंतातुर असावें, हें स्वाभाविक नव्हतें काय ? पण कंपनीची दृष्टि ती नाही. तें नवें नाटक व केळकरांचें नाटक. म्हणून कसेंहि वठलें तरी चारदोन प्रयोगांना पैसे देणारच. आणि आपण पुण्यांतून बाहेर पडून अितर गांवीं त्याचे जसजसे प्रयोग करूं तसतसें तें अधिक चांगलें बसेल. तेव्हा तें घाअीने पुण्यास काढलें तरी काय हरकत ? अशा विचाराने कंपनीने घाअी चालविली. तसेंच मी नाटककार गांवांत होतों म्हणून त्यांनी, कच्च्या बिनरंगी तालमी होत असतां, अभिनय-भाषणें वगैरे कशी काय होतात, कोठे चूक निघते, कोठे दुरुस्ती करण्यास पाहिजे, कोठे पात्रांना भाषणांतील मर्माची समजूत करून द्यावयास पाहिजे, हें पाहण्याकरिता मला तालमीला निमंत्रण करावयास पाहिजे होतें. तेंहि कधी केलें नाही. परंतु घाअीघाअीने कशा तरी नकला, धड पाठ न करतांहि, ओरबाडून घेअून, रंगीत तालमीची तारीख ठरविली; व प्रयोगाच्या परवानगीकरिता त्याचें हस्तलिखित डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाकडे पाठविलें.
 (६८) मी रंगीत तालीम पाहिली तेव्हा नकलाहि धड पाठ नाहीत असें दिसून आलें. तेव्हा नाटक आणखी थोडें बसल्याशिवाय करूं नका, दोन आठवडे तरी थांबा, व तोंपर्यंत मी प्रयोगाला परवानगी देत नाही असें समजा, असें त्यांना सांगून मी निघून आलों. पण कंपनीचे मालक अत्यंत अहंमन्य. त्यांना आपल्या नाट्यकौशल्याचा अभिमान होता, व त्यांतूनहि ते स्वतःच यापूर्वी नाटक-ग्रंथकार बनले होते. तेव्हा त्यांच्यापुढे मी माझें शहाणपण चालवावें हा त्यांना माझा मोठा गुन्हाच वाटला ! त्यांनी मी गेल्यावर मागे अकांडतांडव केलें, व आम्हां 'पदवीधर' नाटक-ग्रंथकारांवर खूप तोंडसुख घेतलें ! पण मी परवानगी देत नाही म्हटल्यावर घोडें थोडेंसें अडलेंच. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशीं कांही मंडळी मध्यस्थीला मा. ज. अु. ६