पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैद्यकशास्त्रात जसा प्रत्येक विकारावर फक्त औषधाद्वारा त्याच्या निवारणाचा प्रयत्न होतो, तसेच आपण खत, पाणी याद्वारा शेती उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो. परंतु समरसतेने प्रार्थना केल्यास काय होते हे पाहण्यासारखे आहे. पिकांचे आरोग्य तर निश्चितच सुधारेल पण 'अधिकस्य अधिकं फलं ।' या न्यायाने उत्पन्नही वाढेल हे बीजावर केलेल्या प्रयोगाचे फलित येथेही आढळेल. मानवाच्या गंभीर आजारात अनेक विद्वान ‘ध्यानधारणे'चा उपाय सुचवतात. परंतु ध्यानधारणा लोकांना वाटते तितकी सोपी नाही. अष्टांगयोगापैकी यम, नियम, आसन, प्राणायाम ह्या पूर्वकार्याची गरज नाकारली जाते. प्रत्याहार म्हणजे सर्व भावनांचे संपूर्ण नियंत्रण. राग, लोभ, मोह या षड्रिपूंचा प्रतिकार. हे कार्य अतिशय अवघड आहे. यामुळेच या पूर्व जरूर घटकांशिवाय केलेली ध्यानधारणा तात्पुरत्या स्वरूपाची शांती देते. परंतु समरस होऊन केलेली प्रार्थना मात्र गुण देते. अगदी अलीकडील एक-दोन उदाहरणे पाहू. .

  माझ्या घरोब्याच्या परिवारापैकी एक मित्र व त्यांची पत्नी यांच्या या कहाण्या आहेत. त्यांचे जवळचे अनेक नातेवाईक डॉक्टर्स आहेत. परंतु माझे भाग्य असे की माझ्यावर त्या सर्वांचाच आत्यंतिक विश्वास आहे. त्यांची कहाणी अशी - पूर्वी मिलिटरीत होते व कर्नल म्हणून निवृत्त झाले. आता वय सुमारे ६५. गेल्याच वर्षी त्यांना हृदयविकार झाला. त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांत तुंबे होते. अँजिओग्राफीमध्ये बरेच तुंबे आढळून आले. प्रथमावस्थेत असे तुंबे आहार, व्यायाम व होमिओ औषधे यांनी नाहीसे होऊ शकतात. परंतु यांची केस फारच पुढे गेलेली होती व शस्त्रक्रियेशिवाय दुसरा इलाज नव्हता. ते स्वतः श्रद्धावान, अनेक संस्कृत ग्रंथांचे पठण केलेले आहेत. त्यांना आहार व शस्त्रक्रिया सफल होण्यासाठी व शस्त्रक्रियेनंतर जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी मी होमिओ औषधे दिली होती. शस्त्रक्रिया सुरळीत झाली, जखमाही अपेक्षेपेक्षा लवकर भरून येत होत्या. परंतु त्यांना अनपेक्षितपणे कफ झाला. यातून नवीनच गुंतागुंती निर्माण होण्याची भीती वाटू लागली. ते हृदयरोगतज्ज्ञही त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होते. पण कफ कमी होईना. तेव्हा त्या गृहस्थांनी मला बोलावून घेतले व मी त्यांना त्वरित छाती मोकळी होण्यासाठी औषधे दिली आणि 'अहो आश्चर्यम्' त्यांचा कफ चोवीस तासांत कमी झाला व दोन दिवसांत छाती स्वच्छ झाली. त्या डॉक्टरांनाही आश्चर्य

१०८