Jump to content

पान:आरोग्यशास्त्र.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १९७ हॉक्किनचे प्रोफिलॉक्टिकचा फार मोठा उपयोग होतो. प्रौढ मनुष्याला ४ सी. सी. व्हॅक्सिनची पिचकारी देतात. ह्याने रात्री १०२° ते १०४° ज्वर येतो, अंग ठणकतें व टोचलेल्या जागेत वेदना होतात. ह्या व्हॅक्सिन्- पासून सहा महिनेपर्यंत प्लेगापासून निर्भयता प्राप्त होते. हें टोचल्यावर सहसा रोग होत नाहीं ; व झालाच तर असले बहुतेक सर्व रोगी बरे होतात. रोग झाल्यावर रोग बरा करण्यासाठीं यर्सिनचें सीरम उपयोगी आहे असे म्हणतात. मलेरिया मॅन्सन, रॉस, कॉच, प्रसि, सेली यांनीं असें सिद्ध केलें आहे कीं, मलेरियाच्या जंतूंचें डांस हें कायमचें घर आहे. व मनुष्य प्राणी हंगामी वसतीस्थान आहे. वानर, पाकोळ्या व दुसऱ्या कण्याच्या प्राण्यांत हे जंतू राहतात. एका डांसापासून दुसरे डांस दूषित होतात. डासांची वाढ पाण्याशिवाय होत नाहीं. अगदी कोरड्या जागेत ते मरण पावतात. मादी पाण्याच्या पृष्ठभागावर अंडी घालते. म्हणून परे- सैटचा नाश करण्यासाठीं पाण्यावर पॅरेफिन व केरोसीनसारखें हलकें तेल सोडावें म्हणजे हवा न मिळाल्याने अंड्यांपासून झालेली लाव मरण पावतात. खंदक, गटारें, डबकीं हीं बुजवतां व कोरडी करतां न आलीं तर मलेरियाच्या विषाचे नाशार्थ हा उपाय योजावा. लार्वी व निंफी हिंवाळ्यांत वसंताच्या आरंभी कमी असतात तेव्हां तो उपाय करावा. तेव्हां त्यांच्या नव्या पिढ्या उत्पन्न झालेल्या नसतात. मनुष्यामध्ये मलेरियाचे जंतू शिरण्याचा प्रकार खाली दिला आहे. दूषित झालेला डांस मनुष्यास चावल्यावर त्याच्या सोंडेबरोबर मनुष्याच्या अंगांत जंतू शिरतात. तेथे यांची वाढ होते. तांबड्या रक्तकणाचे आंत ते प्रवेश करतात व तांबड्या कणांतील मुख्य द्रव्य हिमोग्लोबिन् ह्यावर