Jump to content

पान:आरोग्यशास्त्र.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ आरोग्यशास्त्र प्रतिबंधक उपायः -- (१) रोगाची खबर देण्याची सक्ति. (२) सौम्य फिरत्या रोग्यांचें बॅक्टोरियाविषयक परीक्षण. सांथीचे अगोदर असले फिरते रोगी असतात. ( ३ ) रोग्याला दूर ठेवणें व रोग्याचे कपडे, खोली इत्यादींचें निर्जंतुकरण करणे. घरांतील इसमांना दहा दिवस कारं- टैनमध्ये ठेवणें. ( ४ ) हॉकिनचें प्रोफिलॅक्टिक ( प्रतिबंधक ) वॅक्सिन व यर्सनिचें रोगहारक प्लेग सिरम हे फार गुणकारी उपाय आहेत. ( ५ ) त्या व आसपासच्या गांवांतील उंदरांचा होईल तितका संहार करावा. उंदीर पिंजऱ्यांत धरणें, त्यांना विष घालणें, मांजर व कुत्रीं पाळणें, उदी उंदीर आणविणें, गंधकाच्या व अन्य विषारी वायूंच्या धुरानें नाश करणें इत्यादि उपाय योजावे. डॅनीज बॅसिलसने उंदरांमध्यें एक एपिटिक आजार उत्पन्न करावा. हा आजार उंदरांमध्यें पसरून ते मरतात. हा माणसांना होत नाहीं. डॅनीरज बॅसिलसची लागवड केलेले द्रव अन्नांत घालून उंदरांना खावयास ठेवावें म्हणजे ते मरतात. (६) प्लेग उत्पन्न होतांच आसपासच्या लोकांनीं गांवाबाहेर रानांत रहावें. आजारी असल्यास त्यास दूर ठेवावें. दूषित घर, कपडे वगैरेंचें निर्जंतुकरण करावें. (७) दुसऱ्या व दूषित जागेहून प्लेगमुक्त गांवांत लोक आल्यास त्यांची दहा दिवस रोजची तपासणी ठेवावी. ( ८ ) मोठ्या व मध्यवर्ति स्टेशनांवर सर्व उतारूंची तपासणी करावी. प्लेगचा रोगी भेटल्यास त्यास आतुरालयांत पाठवावें. संशयित दिसल्यास प्लेग कँपमध्ये बरा होईपर्यंत ठेवावें. ह्या रोगाची उत्पत्ति घाणीपासून होते. म्हणून म्युनिसिपलिटीनें व शहरवाल्यांनी आपआपल्यापरी शक्य तितकी स्वच्छता ठेवावी. प्लेगदूषित घरें जंतुविरहित करण्यांत केरोसीन तेल व सोप ह्यांचें इमल्शन चांगलें असतें असें अनुभवानें सिद्ध झालें आहे. ह्यानें पिसवा दोन मिनिटांत मरतात.