Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५० बृहयोगवासिष्ठसार. कर वनात जाऊन एका रम्य सरोवराध्या काठी तप करू लागला. 'भग- वान् शौरीचे दर्शन होई तो मी बसेंच उग्र तप करणार' असा निषय करून तो गळाभर पाण्यांत उभा राहिला. त्याच अवस्थेत त्याचे पाठ महिने लोटले. नंतर एकदा उप्रतपाने सतप्त झालेल्या त्याच्याकडे हरि थापण होऊन आला आणि म्हणाला, " ब्राह्मणा, पाण्यातून वर ये बभिमत वर माग, तुझा नियमवृक्ष सफळ झाला आहे" त्यावर ब्राह्मण म्हणतो-भगवन्, तुला नमस्कार असो. तुझी ही जगत- नावाची पारिमार्थिकी माया मला दाखीव. तिला साक्षात् पहावे, अशी माझी इच्छा आहे. ते ऐकून भगवान 'बरे आहे, त्या मायेला त पहाशील व तिचा त्यागही करशील' असे म्हणाला व गुप्त झाला. त्यानतर, हे रामा, ब्राह्मण पाण्यातून निधन कोरड्या भूमीवर माला. सरोवराच्या जलाने न्याचे भग व जगत्पतीच्या दर्शनाने त्याचे मन शीतळ झाले होते. हरिदर्शनाने अति सतुष्ट झालेल्या त्याचे काही दिवस ब्राह्मण-कर्मा- नेच त्या वनात गेले. नतर एकदा तो महर्षितुल्य गाधि मनात विष्णून्या वाक्याचे स्मरण करीत ज्यातील कमरें फुलली आहेत अशा सरोवरात स्नान करू लागला, व अघमण मत्राचा जप करीत असताना अकस्मात् त्याच्या चित्ताला भ्रम झाला. वायुध्या वेगाने गुहेत पडणान्या वृक्षाप्रमाणे त्याने आपले शरीर घरात मरून पडलेले पाहिले. त्याची प्राणापान किया बंद पडली होती. सकलेल्या पानाप्रमाणे त्याचे मुग्व निम्नज झाले होते. दयापासून तोडून टाकलेल्या कमलाप्रमाणे त्याचे शव झालं शरीर सर्वतः म्लान झाले होते. ज्याच्यातील नक्षत्रे लोपटी आहेत अशा प्रातःकाळच्या आकाशाप्रमाणे त्याचे नेत्र पाढरे झाले. यष्टिरहित ग्रामाप्रमाणे त्याचे शरीर धुळीने भरले. टिटन्या जशा एकाद्या वृक्षाला कर्कश भावाज करीत वढितात त्याप्रमाणे आक्रोश करणान्या त्याच्या मानानी त्याला सर्वतः वेढिले होते. जिच्या नेत्रातून अश्रूच्या मतत धारा चालल्या आहेत अशा त्याच्या भानें त्याच्या पायांचा आश्रय केला होता. रडणान्या वृद्ध मातेने भापल्या हाताने त्याच्या हनुवटीला स्पर्श केला होता व बाकीचे माक्रोश करणारे भाप्त सभोंवर बसले होते. त्याचे भोंठ उघडे राहून एकमेकांस लागलेले दांत बाहेर दिसत होते. त्यामुळे ते शब मापस्या भनित्य जीवि- ताण इसतच माहे, असा भास होत असे.