Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरणं-सर्ग २. सर्ग २--या सर्गात, बुद्धिमान् विश्वामित्रमुनींनी ' रामास उपदेश करा ' अशी वसिष्ठाची प्रार्थना केली व तेही उपदेश करण्यास तयार झाले, असे वर्णन केले आहे श्रीविश्वामित्र—बा राघवा। शुकाप्रमाणेच तुझ्याही चित्तावरील मळ काढून टाकिला पाहिजे. अहो मुनिवर्य, हा दशरथपुत्र भोगाविषयी अत्यत विरक्त झाला आहे. ज्ञानी पुरुषाचे हेच पहिले लक्षण आहे. विषयाचा भोग घ्यावा, ही वासनाच बध दृढ करिते व ती शात झाली असता तो क्षीण होतो. रामा, तत्त्वज्ञ वासना नाहीशा होणे यामच मोक्ष म्हणतात व त्या होत रहाणे यास बध समजतात. आत्म्याचे शा- ब्दिक ज्ञान होणे फारसे कठिण नाही थोड्याशा प्रयत्नानेही ते होते पण विषयाविषयी विरक्त होणे फार कठिण आहे ज्या महात्म्याच्या चित्तास भोग बलात्काराने ओढून नेत नाहीत तोच आत्मज्ञ व पडित होय. आपली कीर्ति व्हावी, लोकानी आपला सत्कार करावा, आप- णास लाभ व्हावा इत्यादि उद्देश जेथे आले तेथे ज्ञानाचा गधही नसणे अगदी साहजिक आहे व तत्त्वाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर भोगाची तृष्णा अवशिष्ट राहणेही अशक्य आहे अहो मुनिश्रेष्ठ, या राघवाचे ठायी वैराग्य किती आले आहे, हे तुह्मी स्पष्ट पहाताच आहा. आता " तू जे जाणत आहेस, तेच तत्त्व होय " इतके याच्या अनुभवास आणून दिले म्हणजे यास परमानदाचा लाभ होईल. यास्तव हा भगवान् वसिष्ट मुनि या महात्म्या रामाच्या चित्तास विश्राति मिळेल अशी काही युक्ति सागू दे. कारण हा या कुळाचा गुरु आहे. शिवाय हा सर्वज्ञ सर्व पदार्थास तात्त्विक दृष्टीने व योग-सामर्थ्याने साक्षात् पहाणारा व त्रिकालदर्शी आहे. भो भग- वन् वसिष्ट, पूर्वी आपले वैर शात व्हावे म्हणून ब्रह्मदेवाने आझा उभय- तास केलेला उपदेश ध्यानात असेलच. त्याच्या अनुरोधानेच या आपल्या शिष्यास उत्तम युक्ति सागा. म्हणजे हा रघुवंशज परम शातीस प्राप्त होईल. हा पूर्ण अधिकारी असल्यामुळे याला उपदेश करिताना काही क्लेश होणार नाहीत. उलट उत्तरोत्तर अधिक आनद होईल. पाप्याना उपदेश करण्याचा प्रसग मात्र कोणावर येऊ नये. स्वच्छ आरशात जसे प्रतिबिब सहज पडते त्याप्रमाणे निष्पाप व त्यामुळेच निर्मळ अतःकरणात उपदेश स्थिर होऊन रहातो. विरक्त सच्छिष्य मिळणे हे तरी एक मोठे