Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/४५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६० बृहद्योगवासिष्ठसार, ध्यानांत धरिले पाहिजे. अर्थात् मन मुख्य आहे. इद्रिये मुख्य नव्हेत. आत्मा व अनात्मा अशा दोन परस्पर विलक्षण कोटी आहेत. मूढ पुरुष मनास आत्मकोटीत घालून, " मी " असें ह्मणून, त्याचे आत्मत्वाने ग्रहण करितात. पण आत्मवेत्ते मनास अनात्म कोटींत घालून ते देहादिकां- प्रमाणे जड आहे, असे समजतात. खरोखर असे समजणारे तत्त्ववेत्ते वद्य होत. कारण त्याचे मन अमन (मननशक्तिरहित ) झाल्यामुळे अति सुंदर स्त्रियानी जरी त्यास घट्ट आलिंगन दिले तरी ते काष्ठाच्या अथवा भितीच्या स्पशाप्रमाणे निर्विकार असतात. ह्मणजे सुख- निमित्त झाले असताही त्यास सुखानुभव घडत नाही. एक विरक्त ज्ञानी एकदा एका निर्जन अरण्यात बसून ध्यानात निमग्न झाला असता एका लाडग्याने त्याचा माडीवर पसरून ठेविलेला तळ हात खाला. पण त्यास ते कळले नाही. झणजे दुःखाचे निमित्त झाले असताही त्यास दुःखाचा अनुभव आला नाही. साराश मनाच्या अभ्यासाप्रमाणे सुखदुःखानुभव येतो. मन स्थिर नसल्यास शिक्षकाने सागितलेला पाठ विद्यार्थ्यास थोडासाही कळत नाही. मनुष्य आपल्या घरातच असतो, पण त्याचे मन पर्वताच्या शिखरा- वर गेले असता त्यास घराचे विस्मरण होऊन पर्वत, गुहा, तेथील अरण्य इत्यादिकाचेच भान होऊ लागते व त्याचप्रमाणे सुख किवा दुःखही होते. स्वप्नांत मनाच्या केवळ कल्पनेने केवढाले मोठ मोठे पदार्थ दिसनान, याचा तू जरा विचार कर बरे ! समुद्रगत जलात जसे अनेक तरंग त्याप्र- माणे शरीरगत मनात पदार्थ. अकुराची जशी पत्र-पुष्प-फलादि शोभा त्याप्रमाणे मनाची जाग्रत्-भ्रम व स्वप्न-भ्रम ही शोभा आहे. सोन्याची मूर्ति सोन्याहून जशी भिन्न नाही त्याप्रमाणे जाग्रत् व स्वप्नक्रिया चित्ताहून भिन्न नाही. फेंस, तरग इत्यादि जसे जलाचे विकार त्याप्रमाणे अनेक वस्तु हा मनाचा विकार आहे. लवणराजा केवल मानसिक कल्पनेने जसा चाडाल झाला त्याप्रमाणे हे मननमात्र मनही विस्तृत जग होतें. तात्पर्य मन ज्या ज्या आकाराचे होते त्याचा त्याचा अनुभव येतो. हा सर्व मनाच्या मननाचा खेळ आहे. सकल्प हे याचे मूळ आहे. जीव संकल्पा- नेच मरतो व पुनः उत्पन्न होतो. दीर्घ अभ्यासामुळे आकाररहित मनच जीवभावास प्राप्त होते. तिळात जसें तेल असते त्याप्रमाणे मनामध्ये सुख- दुःख असते. देशकालानुरूप तेल पातळ होते किवा थिजते त्याप्रमाणेच