Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ बृहद्योगवासिष्ठसार. राजा पुत्रमोहात ता त्याला मजबरोबर पाठीव. माझा यज्ञ दहा दिवस चालणार आहे. तेवढ्या अवकाशात तुझ्या पुत्राने राक्षसाचा विध्वस करून माझ्या यज्ञाचे रक्षण केले की त्याचे परम कल्याण करून मी त्यास तुझ्याकडे आणून पोचवीन. धार्मिक आपल्या वचनाचे परिपालन करीत असतात. याचकाचा मनोभग करणे यासारिखे पाप नाही. मी केवल याचकच नव्हे तर या वेळी शरणार्थी होऊनही तुझ्याकडे आलो आहे. करिता तुझे वसिष्ठादि मत्रीही तुला याविषयी अनुमोदन देवोत. माझा यज्ञाचा काल निघून जाईल, असे करू नको. राजा, तू आपल्या पुत्रा- विषयी काही चिता करू नको. ठेवीप्रमाणे मी त्याचे रक्षण करीन. प्रसगी थोडेसे कार्य करण्यातही मोठे उपकार होतात व प्रसग नसताना कितीही उपकार केले तरी ते व्यर्थ होतात, हे तुला ठाऊकच आहे. असे बोलून तो मुनिवर्य यावर राजा काय बोलतो, ते ऐकण्याकरिता अति उत्सुक होऊन स्वस्थ बसला इकडे राजाही त्याचे भाषण ऐकून मनात अति खिन्न झाला, व आता यास काय सागावे या विचारात पडला ७. सर्ग८-~या सात, स्नेहामुळे राजाने, राम युद्ध करण्यास अयोग्य आहे, अम ह्मणून व रावणादि रासमाच्या बलाचा निर्देश कम्न, कमा खेद केला, त्याचे वर्णन आह् __ तो राजा एक क्षणभर तर मोहित झाल्यामारिग्वाच झाला. पण इत- क्यान धर्य धरून दीनवाणीन माधिजास म्हणतो-भगवन , माझ्या रामाल। अजून सोळावे वर्षही लागले नाही. तो त्या भयकर राक्षसाबरोबर कसा युद्ध करील । आपल्या यज्ञाचे रक्षण झाल्याशी काम की नाही ? त्या राक्षमाशी लढण्याकरिता एक अक्षौहिणी सेना घेऊन मी रवत येतो. माझे सर्व शूर सेनिक त्या राक्षसाचा नाश केल्यावाचून रहाणार नाहीत. रामाला युद्धाचा मुळीच अनुभव नाही. तो त्या कपटाने लढणा-या राक्ष- सापुढे कीतिवेळ टिकणार ? त्यास शस्त्रास्त्राचा उपयोग कसा करावा, हेही अजून माहीत नाही. फुलाच्या बागातून हिडावे, बरोबरीच्या मुलाशी खळावे, उड्या माराव्या, जलविहारादि करावं, एवढे काय ते त्याला ठाऊक. शिवाय, हे ब्रह्मन् , अलिकडे तर माझ्या दुर्भाग्यामुळे तो क्षीण होऊ लागला आहे. त्याच्या शरीरात तेज व बल कसे ते मुळींच राहिले नाही. तो मनातल्या मनात एकसारिखा झुरत असतो.