Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरणं-सर्ग ३. तुझा रामायण प्रथ प्राण्यांस ससारसागरांतून पार निघून जाण्याकरिता एक नौकाच होणार आहे. परोपकारापुढे दीनदयाळु सज्जन आपल्या शारीरिक श्रमांस मोजीतही नसतात. हे ध्यानात धरून केवळ लोक- हितार्थ हे उत्तम शास्त्र तू माझ्या आज्ञेने शेवटास ने " असें बोलून तो परमेश्वर गुप्त झाला. मलाही या अकल्पित घडून आलेल्या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटले. माझा उत्तर रामायणाविषयीचा मद विचार त्यामुळे तीव्र झाला व त्या देवाची आज्ञा पूर्ण करण्याचे मी मनात आणले. माझा भरद्वाज शिष्य तेथे होताच. मी ब्रह्मदेवाच्या आज्ञेने उत्तर रामायण कर- णार आहे, असे त्यास समजताच त्या नम्र अधिकाऱ्याने " महागुरो, या भयकर ससारामध्ये रामाने व त्याच्या इतर सबधी जनांनी व्यवहार कसा केला, ते मला सागा. हणजे त्याचे अनुकरण करून मीही आपला उद्धार करून घेईन." असे मटले. हा त्या योग्य शिष्याचा प्रश्न ऐकून मी त्यास झटले, " भरद्वाजा, मी सागतो ते ऐक. या कथाश्रवणाच्या योगाने तुझे पाप नाहीसे होईल, व रामाप्रमाणेच जर तू आपले आचरण ठेविलेस तर या सकटातून मुक्त होशील. मोक्षाचे उपाय सागणारी ही कथा तुझ्या प्रमाणे दुसऱ्याही अधिकाऱ्याच्या उपयोगी पडेल. कारण यातील एकादा उत्तम उपायही ज्याच्या हाती लागतो ते धन्य पुरुप शोक, दैन्य, व सताप यातून तत्काल मुक्त होतात २. सर्ग३-वासनाक्षय हाच या दृश्य जगाच्या माजनाचा उपाय आहे, असे अगोदर प्रतिपादन करून नतर रामाच्या यात्रेचे वर्णन यात केलं आहे. हे भाग्यवाना, रामाचे उदाहरण घेऊन मी आता तुला जीवन्मुक्ताची स्थिति सागतो. प्रथम जीवन्मक्तीचे लक्षण व स्वरूप तुला सागितले पाहिजे. हे जग आकाशाच्या नीलवर्णाप्रमाणे भ्रमाने उत्पन्न झाले आहे. आकाश झणजे काही नसणे. ते जसे आपल्या आसपास आहे तसेच नक्षत्रे, चद्र, ग्रह इत्यादि जेथे दिसतात तेथेही आहे. पण दृष्टिदोषामुळे भ्रम होऊन आपणास ते निळ्या रंगाचे व उपड्या कढयीच्या आकाराचे दिसते. त्याचप्रमाणे वस्तुतः जग ह्मणून काही पदार्थच नसताना ते आपणास भ्रमामुळे आहेसे भासते. या भ्रमास अध्यास ह्मणतात. ' आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान न झाल्यामुळे झणजेच अविद्येमुळे तो होत असतो. या अविद्येचा आत्मज्ञानाने उच्छेद करून,