Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८६ एकनाथी भागवत. से बोलणे न साहे ॥ ३ ॥ जे बोला बुद्धी न ये सहज । तें भक्तिप्रेम निजगुज । उद्धवा द्यावया गरुडध्वज । केले व्याज खेवाचे ॥ ८४॥ भक्तीचें शोधित प्रेम । उद्धवासी अति. उत्तम । देता जाला पुरुषोत्तम। मेघश्याम तुष्टला ॥८५॥प्रेमळाची गोठी सांगतां । विसरलों जी श्लोकार्था । कृष्णासी आवडली प्रेमकथा । ते आवरितां नावरे ॥ ८६ ।। प्रेमाची तंव जाती ऐशी। आठवू येऊ नेदी आठेवणेशी । हा भावो जाणवे मज्जनासी । ते भक्तिप्रेमासी जाणते ॥ ८७॥ हो को ऐसेही असतां । माझा अपराधू जी सर्वथा । चुकोनि फाकलो श्लोकार्था । क्षमा श्रोती करावी ॥ ८८॥ तंव श्रोते ह्मणती राहें । जेथे निरूपणी सुख आहे त्यावरी बोलणे हे न साहे। ऐसे रहस्य आहे अतिगोड ॥ ८९॥ आधीच भागवत उत्तम । तेथे हे वाखाणिले भक्तिप्रेम । तेणे उल्हासे परब्रह्म । आमुचे मनोधर्म निवाले ॥ ६९० ॥ श्लोकसगतीची भंगी। दूर ठेली कथेची मागी। हे प्रार्थना न लगे आझालागी । आह्मी हरिरगी रंगलों ॥९१ ॥ ऐकतां भक्तिप्रेमाचा जिव्हाळा । श्रवणसुखाचा पूरू आला । हे न वोलसीच उंगला । निरूपण वहिला चालवी ॥९२ ॥ सांगता प्रेमळांची गोठी कृष्णउद्धां एक गाठी।मे पडली होती मिठीते कृष्णू जगजेठी सोडवी ॥१३॥ ह्मणे हे अनुचित सर्वथा । आतां उद्धवू ऐक्या येता । तरी कथेचा निजभोक्ता। ऐसा श्रोता कैचा मग ॥ ९४ ॥ माझिया भक्तिज्ञानविस्तारा । उद्धवूचि निजाचा सोयरा। यालागी ब्रह्मशापावाहिरा । काढितू खरा निजबोधे ॥ ९५ ॥ जितुकी गुह्यज्ञानगोडी। भक्तिप्रेमाची आवडी । ते उद्धवाचिकडे रोकडी । दिसते गाढी कृष्णाची ॥ ९६॥ भक्ति प्रेमाचा कृष्णचि भोक्ता कृष्णकृपा कळलीसे भक्तां । हे अनिर्वचनीय कथा। नये वोलता बोलासी ।। ९७ ॥ कृष्ण उद्धवासी हाणे आता । सावधू होयीं गा सर्वथा । पुढारी परियेसी कथा । जे भक्तिपथा उपयोगी ॥९८॥ सर्व कम मदर्पण | फळत्यागें न करके जाण । तरी अतिसोपं निरूपण । प्रेमलक्षण सांगेन ।। ९९ ॥ ___श्रद्धालुम कथा शृण्वन्सुभद्रा रोकपावनी । गायन्ननुसरन्कर्म जन्म चाभिनयन्मुहु • ॥ २३ ॥ । करिता माझी कथा श्रवण । काळासी रिग नाही जाण । इतराचा पौडू कोण । कर्मबंधन तेथें कैचे ॥७०० ।। जो हरिकथेने गेला क्षण । तो काळासी नव्हे प्राशन | काळसार्थकता त्या नांव जाण । जे श्रद्धाश्रवण हरिकथा ॥१॥ परीस, कथेचें महिमान । श्रद्धायुक्त करिता श्रवण । तिहीं लोकींचे दोपदहन । अक्षरे जाण होतसे ॥२॥ ऐक श्रद्धेचे लक्षण । करितां हरिकथाश्रवण । ज्याचे अर्थारुढ मन । श्रद्धाश्रवण त्या नाव ॥३॥श्रवण ऐकोनि नास्तिक । देवोचि नाही ह्मणती देख । आहे ह्मणती ते पोटवाइक । आझांसी निम्शेख केना ॥४॥ या नास्तिका देवोनि तिळोदक । ज्याचे वाढले आस्तिक्य देख । श्रद्धा त्या नांव अलोलिक । अगाध सुख तीमाजी ॥५॥श्रवणी ध्यानीं अतराय । लय विक्षेप कपाय । का रसस्वादुही होय हे, चारी अंपाय चुकवावे ॥ ६॥ ऐकताही । अलिंगननिमित २ स्वभाव, धर्म ३ आठवासी. ४ श्रोत्यानी ५ वर्णिल ६ भग, नाश ७ सयध, सदर्भ दमुकाट्याने ९ अगोदर कथा पुढे चालू दे १० आपल्या भकाचा ससा ११ वोलता न येणारी १२ प्रवेश १३ प्रतिष्ठा, पराक्रम १४ अर्थाकडे वेधलेले १५ पोटभरू, १६ अनुभवाला येत नाही १७ नास्तिकावर पाणी सोडून, त्याचा सर्वथा त्याग करून १८ सर्वोत्कृष्ट १९ विघ्न २० स्य, विक्षेप, कपाय ( मदपणा)य रसास्वाद हे चार दोप, "लयस्तमश्च विक्षेपो रमाखादश्च अन्यता । एव यान्निवाहुल्य साज्य ब्रह्मानिदा शन'-अपरोक्षानुभूति