Jump to content

पान:Sanskruti1 cropped.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतातील कथानक ज्याप्रमाणे अतिप्राचीन काळापासून ज्ञात आहे. म्हणजे पाणिनीलाही ज्ञात आहेतसे रामायणाचे नाही. रामायणाचे कथानक फार प्राचीन काळापासून ज्ञात नाही. पतंजलीच्या काळी या कथानकाला फार मोठे महत्त्व आले होते, असे मानता येणार नाही. ज्या शैलीत रामायणाची रचना आहेती शैली अभिजात संस्कृत काव्यातील काव्यशैलीशी मिळती-जुळती आहे. शिवाय, सर्व पौराणिक वाङ्मय आणि महाभारत यांना जसा सूतांचा आधार आहे तसा रामायणाला नाही. प्रतिष्ठा पुराणाची मिळालेला, पण सूतांचा आधार नसणारा एकमेव हिंदू ग्रंथ रामायण हा आहे. इ. सनाच्या पूर्वी दुस-या शतकाच्या नंतर क्रमाने रामायणाची प्रतिष्ठा वाढत चाललेली दिसते. हरिवंशपुराणाच्या निर्मितीपर्यंत रामायण हा ग्रंथ बराच प्रतिष्ठित झालेला होता. इरिवंशाचा काळ जर इ. सनाचे दुसरेतिसरे शतक घेतलातर फार दूर नाहीरामायणातील , भासापेक्षा हा काळ . कथांवर भासाची . हरिवंशपुराणात असणारी नाटके आहेतनलकूबर आणि रंभ यांची कथा जर विचारात घेतलीतर उत्तरकांडातील कथा , पुष्कळ हरिवंशकाळी प्रतिष्ठित झाल्या होत्य, असे दिसते. इ. सनाच्या पूर्वी दुस-या शतकापासून पुढच्या पाचशे वर्षात रामायणकथा एकाएकी महत्त्वाला चहून महाभारताइत प्रतिष्ठित झालेली दिसते. ज्या काळात ही घटना घडत होती, त्याच काळात त्रिपिटकांची रचना चालू होती. जतककथा या बौद्धांच्या अतिप्राच° कथा त्रिपिटकांच्या ग्रंथसमूहात समाविष्ट झालेल्या आहेत. या जातककथा रामायणात रामं आहे, सीत आहे. दशरथ आहे, पण रावण मात्र नाही: रामायणकथेत नुसते बालकांड, नाही कदाचित रामकथंत रावणच उपरा असण्याचा संभव आहे. उत्तरकांडच प्रक्षिप्त असणार , तर बौद्धांच्यां रामकथेबरोबर जैनांच्या रामकथेची, किंवा स्पष्ट तरं जैनांच्यां रावणेकथेची एक स्वतंत्र परंपरा आहे. या रावणकथेतील रावण सत्प्रवृत्तं आणि विजेतां आहे. वनरवीर त्याचे साहाय्यकारी आहेत: आणि रामकथेतील हनुमंत ही अतिप्राचीन नगररक्षक किंवा टोळीची रक्षक देवता असण्याचा संभव आहे. दक्षिणेत ठिकठिकाणी ग्रामरक्षक म्हणून असणारी = देवता विवाहांची साक्षीदार आहे. तिची स्वतंत्र देवालये आहेत. ही देवता जारणमारणाचाही भाग आहेमंत्रौषधांतही तिचा उल्लेख येतो. वशीकरण . १७२ । । संस्कृती ।।