अंश व छेद दोघांना 8 ने गुणलं तर 816 मिळतो, 9 ने गुणलं तर 918 हा अपूर्णांक मिळतो.
सोप्या गणितात हे गुणोत्तर प्रमाण सरळ दिलेलं असतं. जरा कठीण गणितात हे शोधावं लागतं. आधी सोपी व मग जरा कठीण अशी गुणोत्तर प्रमाणाची गणितं सोडवून पाहू या.
उदा० एका शाळेतील मुली व मुलगे यांचे गुणोत्तर प्रमाण 45 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुलगे किती आहेत ?
- मुलींची संख्यामुलग्यांची संख्या = 45
- आता मुलगे ‘क्ष आहेत असे मानू
- ∴ 45 = 76क्ष
- समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 5क्ष ने गुणू
- 45 x 5 x क्ष = 76क्ष x 5 x क्ष
- ∴ 4क्ष = 380
- ∴ क्ष = 95 ∴ मुलगे 95 आहेत.
या गणितात आपण कशाचा उपयोग केला हे पाहिलंत का ? मुली व मुलगे यांचे गुणोत्तर प्रमाण 45 असं आहे याचा व माहीत नसलेली संख्या क्ष आहे असे मानून एक समीकरण तयार केले व ते समीकरण सोडवून क्ष ची किंमत काढली. समप्रमाणात वाढणाच्या संख्यांची गणितं या पद्धतीने चटकन सोडविता येतात. आणखी एक उदाहरण पहा.
उदा० एका ऑफीसामधे टेबले व खुर्च्या यांचे प्रमाण 25असे आहे. खुर्च्या 260 आहेत तर टेबले किती ?
इथेही टेबलांची संख्या माहीत नाही ती ट आहे असे मानू मग टेबलांची संख्या व खुच्र्यांची संख्या यांचे गुणोत्तर प्रमाण ट260असंही मिळतं व