Jump to content

पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
संतति-नियमन

 आतां अंडाशयाच्या उत्पादक कार्याविषयीं अधिक विचार करूं.. हैं उत्पादक कार्य म्हणजे सूक्ष्मांडांची उत्पत्ति होय हैं वर सुचविलेंच आहे. मुलीचा जन्म होतो त्या वेळींच तिच्या अंडाशयांत असावयाची तितकीं सूक्ष्मांडें असतात. इतकेच नव्हे तर ती मुलगी ऋतुस्नात होईल त्या वेळी देखील नसतील इतकी सूक्ष्मांडें तिच्या जन्मकाल अंडाशयांत असतात. जन्मकाळच्या वेळची अंडाशयांतील सूक्ष्मांडांची संख्या सुमारें एक लाख असते असें गणित देखील शारीरशास्त्रज्ञानीं केलेले आहे. परंतु या एक लाखापैकी बहुतेक कालांतराने नष्ट होतात, व तरुण मुलीला प्रथम रजोदर्शन होतें त्या वेळी त्यांची संख्या सुमारें तीस हजारावर नसते. प्रथमार्तवापासून (Puberty) तो आवहीनतेच्या (Menopause) काळापर्यंत दर महिन्याला एक सूक्ष्मांड परिपक्व होतें. म्हणजे स्त्रीच्या एकंदर आयुर्मर्यादेत तीनशेंपासून चारशें पर्यंत सूक्ष्मांडेंच या परिपक्व अवस्थेतून जातात. यावरून बाकीची सूक्ष्मांडें निसर्गानें उगीचच्या उगीच अंडाशयांत ठेव- लेलीं असतात व तीं निरुपयोगी असतात असें मात्र समजूं नये.कारण कांहीं कारणामुळे एक किंवा दोन्ही अंडाशय बिघडले तर हजारों . सूक्ष्मांडें बिघडून वाया जाण्याचा संभव असतो व मग गर्भधारणेच्या कामास ती निरुपयोगी ठरण्याची भीति असते. ही संभवनीय आपत्ति आली तरी पुरेशीं सूक्ष्मांडें गर्भधारणेच्या कामासाठी तयार असाव या धूर्त व दूरदर्शी हेतूनेंच निसर्गाने सूक्ष्मांडांचा येवढा मोठा साठा स्त्रीच्या अंडाशयांत ठेवलेला असतो. पुरुषाच्या बाबतीतही निसर्गाची ही दूरदृष्टि दिसून येते. वास्तविक पाहतां स्त्रीच्या एका सूक्ष्मांडांत शिरून तें सुफलित करावयास पुरुषाचा एक सूक्ष्म वीज पुरेसा आहे इतकेच नव्हे तर एका वेळी एकाच सूक्ष्म बीजाचा अशा प्रकारें शिरकाव होऊं शकतो. परंतु पुरुषाच्या प्रत्येक वीर्यपातांत अडीचपासून पांच लाखांपर्यंत सूक्ष्मबीजे असतात असे सिद्ध झालेलें आहे.