पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोन्याची कुऱ्हाड

४९

व्यापार माहीत व्हावेत म्हणून त्यांच्या रचनेचा अभ्यास केला तर त्याला मात्र तुम्ही नार्के कां मुरडतां ? बरें, शिमग्यांत टारगट पोरें ज्या रीतीनें जननेंद्रियांचीं नांवें घेतात तशाच रीतीनें व त्याच वृत्तीनें आम्ही त्यांचा उच्चार करीत आहोंत, किंवा करूं असें म्हणण्याचा तर तुमचा हेतू नाहीं ? मग शास्त्रीय दृष्टीच्या उच्च हेतूनें आणि केवळ एका महत्त्वाच्या प्रश्नाचा निकाल करण्याच्या तात्त्विक भावनेनें आम्ही जर या विषयाची चर्चा केली तर तुम्हांला त्यांत बीभत्सपणा तो कोठें दिसतो ? असल्या चर्चेनेंही तुमच्या प्रतिष्ठितपणाला विटाळ होत असला तर तो फाजील सोवळेपणा तुमचा तुम्हांला लखलाभ होवो. सदभिरुचीची असली परीटघडी कल्पना कोणत्याही सूज्ञ माणसाला आज पटण्यासारखी नाहीं. "नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिहमुच्यते । ' या वृत्तीच्या अभिनिवेषानेच हें विसावें शतक भरलेले आहे. ज्ञान हें अत्यंत पवित्र आहे, आणि त्या ज्ञानाचा विषय कसाही असला तरी ज्ञानाच्या पावित्र्यांत कोणत्याही प्रकारचा उणेपणा उत्पन्न होणें शक्य नाहीं. स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांची चर्चा करण्यांत सदभिरुचीचा आमच्याकडून अतिक्रम होतो असें कोणी म्हटल्यास त्याचा आक्षेपच हास्यास्पद ठरेल अशी आमची खात्री आहे. म्हणून आपल्या विषयाच्या विवेचनासाठी ही चर्चा अगत्याची असल्यामुळे ती शक्य तितक्या सोप्या व सुबोध भाषेत आम्ही पुढे केली आहे.
 स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांची रचना समजून घेणें जरुरीचें आहे असें आम्ही म्हटलें खरें; पण वास्तविक पाहतां पुरुषांच्या इंद्रियाच्या रचनेचा विचार गाळून केवळ स्त्रीच्या जननेंद्रियाचा विचार केला तरी तो पुरेसा आहे. कारण, एक तर पुरुषाच्या इंद्रियांची रचना अगदीं साधी व वरवर दिसते त्या प्रकारचीच आहे. त्यांत विभागही फारसे नाहीत व त्या विभागांची गुंतागुंतही मुळींच नाहीं. पण स्त्रीच्या जननेंद्रियाची