पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 पुराभिलेख विद्याच्या दृष्टीने व साधना साप्ताहिकाच्या इतिहासाचे जतन म्हणून या जावक बारनिशीचे असाधारण महत्त्व आहे. हा सामाजिक व ऐतिहासिक ऐवज होय. अशी इतिहास साधने कालौघात मनुष्य विकासाची पावले असतात. ती जपली तर आपणास कुठे होतो नि कुठे आलो याचा आढावा घेता येतो. साधना व साने गुरुजी यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकणारे साधन म्हणून या जावक बारनिशीकडे पाहता येईल.

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/११८