पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्कार. खांडेकरांची ‘कांचनमृग' कादंबरी मला समजावत राहते की, ‘शिक्षणामुळे बुद्धीचा विकास होतो; पण माणसाचं हृदय कोरडं राहिलं तर दुःखच वाट्याला येणार.' म्हणून मग घरासमोर उन्हा-पावसात थांबलेल्या पांथस्थास मला घरात घ्यावंसं वाटतं. त्याला नॅपकिन, टॉवेल देऊन, चहा-सरबत देऊन मदत करावी असं उफराट' वागावं वाटतं ते स्वतःचा । ‘कांचनमृग' होऊ द्यायचा नाही म्हणूनच! 'दत्तक आणि इतर गोष्टी माझ्या लेखी केवळ गोष्टी राहत नाहीत. त्यांतील ‘चकोर आणि चातक' कथा मला केवळ रूपककथा म्हणून कलात्मक वाटत नाहीत तर समाजाचे दोन ध्रुव जोडणारी ‘सेतुकथा' वाटत राहते. नवा प्रातःकाल’, ‘निर्माल्य'सारख्या कथा मला रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल' म्हणून प्रयत्नांचं बळ बांधतात. गार वारा' कथा मला त्यागी बनविते. ‘दवबिंदू' लघुनिबंध संग्रहातील ‘मनातील भुते लघुनिबंध मनातील अनेक द्विधा क्षणी त्यातील डॉ. शांताराम लक्षात ठेवण्यास भाग पाडतो. खांडेकरांचं वक्तृत्व मी कितीदा तरी ऐकलंय. माझ्या लक्षात राहिलंय त्या माणसाचं सतत अस्वस्थ राहणं; म्हणून मी अश्वत्थाम्याची जखम घेऊन वणवण करीत आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/१४१