पान:लंकादर्शनम्.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७२

केली की, कारखान्यांतून येणारे औषध एकसारखे असत नाही व त्याचे रासायनिक घटकही अस्थिर असतात. या तक्रारी नंतर जावामधील अधिकाऱ्यांनी क्विनीन अमुक एकाच तर्‍हेचे असले पाहिजे असे कायद्याने ठरविले आहे.

 क्विनीन ही एका तर्‍हेने अमृतवल्ली आहे. पाश्चात्यांना ही अमृतवल्ली प्रात्प झाल्यावर अनेक देश पादाक्रांत करितां आले व अनेक ठिकाणची व्यापारी केद्रें हस्तगत करितां आली. आफ्रिकेच्या कांगो व नाइल नद्यांच्या खोऱ्यांत कित्येक ठिकाणी इतके डांस असतात की, डासांच्या थव्याने एक प्रकारचा काळोख पडतो असे म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. या डांसांमुळे त्याप्रदेशांत जाऊन रहाणे अशक्य होई. परन्तु क्विनीनचा शोध लागल्यावर अशा प्रदेशांत जाऊन तेथील संपत्ति हस्तगत करणे व आपलें अधिराज्य स्थापन करणे हे पाश्चात्यांस सुगम झालें. क्विनीनच्या जोरावरच आसाममध्ये चहाची लागवड वाढवून अपार संपत्ति मिळविता आली.

 हिंदुस्थानामध्ये "सत्पपर्णी" हे क्विनीनच्या तोडीचे ज्वरघ्न औषध आहे; परन्तु धानिकांच्या व शास्त्रज्ञांच्या सहकार्याच्या अभावी ते तसेच डोंगरावर तिष्ठत राहिले आहे. शार्ड्गधाराने अमुक औषधांत १ तोळा गुळवेल घालावी असे सांगितले आहे म्हणूनच "कोकणी आणि खानदेशी" गुळवेल असा भेद करण्यास जे वैद्य लोक तयार नाहीत त्यानी क्विनीनच्या इतिहावरून योग्य तो बोध घ्यावा.

 परम्याकरितां चंदनी तेल वापरण्याची पद्धति हिंदुस्थान व चीन या देशांत २००० वर्षापासून सुरू आहे. पाश्चात्य लोक त्याचा ३०-४० वर्षांपासून उपयोग करू लागले असे असतां आज फ्रान्स मधून * सँडलमिड ?' या नांवाने ते हिंदुस्थानांत कां व किती येते याचाही प्रत्येकानें विचार करावा, ,