पान:लंकादर्शनम्.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१



हत्ती.

 सोलोनच्या नैसर्गिक संपात्तिमध्ये हत्तीची गणना करावयास कांहींच हरकत नाहीं. प्राचीन काळी हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व राजे हत्तींचा लढायांमध्ये उपयोग करीत. अलेक्झांडरच्या स्वारीपासून झालेल्या अनेक लढायांत, हिंदू राजांच्या सैन्यांत शेंकडो हत्ती असल्याची वर्णने आहेत. हिंदुस्थानांत अनेक ठिकाणी हत्ती सांपडत तरी सीलोनमधून हत्ती व हस्तिदंत यांची मोठी आयात हिंदुस्थानांत होत असे. विजापुरचे राजे गोवे बंदरामार्फत सीलोनशीं व्यापार करीत व तेथून एका गलबतांत १४ ते १६ हत्ती आणीत असत. विजापुरचे महंमदशहाने सीलोन मधून 'प्रभावती' नांवाच्या एका बाईस आणून तिला रक्षा म्हणून ठेविले होते, महमदशहाचे वेळीं विजापुरी शेकडो हत्ती असत. तेथील दरबारचे वर्णन श्री. सरदेसाई यांनी पुढीलप्रमाणे दिले आहे. "ह्याच्यापुढे (सुलतान महमद) नवरत्नखचित शिरपेंच लटकलेलें हजारो मानकरी आणि बडे लोक लीनतेने उभे असत. रत्नभूषणांनी शृंगारिलेले शेकडो हत्ती सज्ज असत. हा नुसता शहरांत फिरावयास गेला तरी ह्याजवर लोक सोन्यारुप्यांची फुले उधळीत. ह्याच्या जिलिबीच्या हजारों घोड्यांच्या जिनांस हिरे, मोत्यें, पांच, माणकें वगैरे लटकलेली असत." विजयनगरच्या साम्राज्याचीही अशीच वर्णने वाचावयास सांपडतात.

 प्रस्तुतकालीं कण्हेरीची फुलेंसुद्धां दुर्मीळ झालेली आहेत त्यामुळे प्राचीन काळची वर्णने अतिशयोक्तीची असावीत असे पुष्कळांस वाटते. पण दक्षिणहिंदुस्थानांत पूर्वी हत्ती अतिशय असत, तसेच सोन्याच्या व रत्नांच्या खाणीही पुष्कळ असत. शिवाय सीलोनमधून अनेक हत्तींची व रत्नांची आयात हिंदुस्थानांत होत असे.

 असो, आजही सीलोनमध्ये शंभर शंभर हत्तींचे कळप अरण्यांत फिरतात, आगगाडीच्या रुळावर कित्येक वेळा हे येतात व गाडीजवळ आली