पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/785

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Communism (kon-'ū-nizm) [Fr. communisme commun, common.] n. धनसमता f, समाईक संपत्तीची पद्दति f, सार्वजनिक संपत्तीचा वाद m, समाजामधील लोकांमध्ये जी अनेक बाबतीत असमता दृष्टीस पडते ती नाहीशी होऊन सर्वत्र समता उत्पन्न झाली पाहिजे हे मत m, विशेषेकरून संपत्तीचे दृष्टीने समाजांतील व्यक्तीव्यक्तीमध्ये जो फरक दिसतो तो नाहीसा व्हावा म्हणून संपत्तीची सारखी वांटणी व्हावी किंवा समाजांतील संपत्तीवर एकाच व्यक्तीचा हक्क नसावा व सर्व संपत्ति समाजाची समाईक समजली जाऊन प्रत्येकास तिचा सारखाच उपयोग व्हावा असे मत n. Community (kom-ūn'i-ti) [O. Fr.-L. communitas-communis, common. n. common possession or enjoyment समाईक मालकी f, समाईक उपभोग m, समाईक धनीपणा m, साधारण प्रभुत्व n, साधारण स्वामित्व n. २ people having common rights, &c. जात f, जाति f, ज्ञात f, ज्ञाति f, जमात f, मंडळी f, पंथ m, फड m. ३ लोकसंस्था f, राज्यसंस्था f, समाजसंस्था f, संस्था f, पांढर f. ४ (with the article the ) the public in general समस्त लोक, लोकसमाज m, प्रजाजन m. pl. ५ ( R.) common character or likeness सास्य n, सारखेपणा m, सामान्यगुण-धर्म m. ६ commonness, frequency (obs.) साधारणता.f, वारंवार होण्याचा धर्म m. गुण m. Commute ( kon-it') [ L. com, & mutare, to change.] v.t.to exchange अदलाबदल f करणे, बदल m. करणे, फेर-मोबदला m. करणे. २ to lessen or diminish (as a sentence or punishment ) कमी करणे, मोठी शिक्षा रद्द करून हकली शिक्षा देणे; as, To C. sentence of death to one of imprisonment for life. c. v. i. बदलणे, भागाभागाने-हप्त्याहप्त्याने रक्कम न देता ती एकदम देणे. Commutabil'ity n. Commut'able a. फेरबदल अदलाबदल व्हावयाजोगा. Commuta'tion n. फेर m, फेरबदल m, स्थित्यंतर n, फेरफार m. २ (obs.) अदलाबदली f, परिवर्तन n, विनिमय m, बद्दलऐवज m, (ताेडजोडीने ठरलेला) मोबदला m. ३ law शिक्षा कमी कडक करणे. ४ ( commutation-ticket) (सफरीवर निघतांना गाडीभाड्याची एकदम) उक्ती रक्कम देऊन घेतलेला प्रवासाचा हक्क m. C.a. अशा प्रवासाचा हक्क देणारा (परवाना किंवा तिकीट). Commu'tative a. commu'tatively adv. Commu'tator n. ( Elect. ) विद्युतप्रवाह उलट दिशेला लावण्याकरितां विद्युयंत्राला लावलेला उपकरण n, परिवर्तक m, (परिवर्तयति इति परिवर्तकः). Commut'ual a. ( R.) एकमेकांचा, अन्योय, परस्पर. Angle of Commutation astron. कोणत्याही ग्रह आणि स्पष्ट सूर्य ह्यांच्या क्रांतिवृत्तांमधील अंतर m, स्थानीयान्तरकोन m. Comose ( ko'nos) | L. coma, hair. ] a. bot. केसाळ (बी) - सकेश, सशिख, शिखावत (ज. मांदार, हरणदाेडी, कावळी, वगैरे.) Compact (kom-pakt') [O. Fr. compactate, compacted