पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

endowing, endowment देणगी f, नेमणूक f, espe. वर्षासन n, वर्षासन करून देणे n, नेमणूक करणे, देणगी n. २ the act of bestowing a marriage portion on a woman स्त्रीधन n . 3 establishment of funds for support (as of an hospital) (दवाखाना इत्यादि धर्मार्थ संस्थेकरिता केलेली) निधिस्थापना f, (धर्मार्थसंस्थेच्या मदतीकरिता) द्रव्यनिधि m. Do'tal a. pertaining to donation देणगीसंबंधी, &c. २ स्त्रीधनासंबंधीं. ३ निधिस्थापनेसंबंधी. Dote (dot) [M. E. dotien, doten, to be foolish; cf. M. Dut. doten, to be silly.) v. i. to be silly, deranged or out of one's wits, to act or talk foolishly or stupidly भ्रमिष्ट होणे, खुळावणे, मूर्खासारखें वागणे-बोलणें. २ to be weak-minded from old age म्हातारचळ लागणे in. com., म्हातारचाळे-म्हातारचेष्टा करणे. २ to be foolishly in love, to bestow excessive love or fondness upon एखाद्यावर फिदा होणे, भुलणे, भुलून जाणे, भाळणे, वेडा होणे, तन्मयतल्लीन-मोहित-अत्यासक्त होणे. Do'tage n. feebleness of mind in old age म्हातारचळ m, चळ m, साठी f, साठीबुद्धी f, पिसे n, बाळे n, (obs.) तारें n, (Provin.), भ्रमिष्टासारखें किंवा मूर्खासारखें आचरण n, वेडेचार m, अतिमूर्खपणा m. ३ (वेडावून गेलेल्याचे किंया भुलून गेलेल्याचे) अतिप्रेम n. ४ an object of dotage अतिशय प्रेमाचा विषय m. Do'tard n. म्हातारचळ्या, साट्या, साठ्याबुद्धीचा, म्हातारबुद्धीचा, नष्टबुद्धि. Doted a. (obs.) मूर्ख. Dot'er n. म्हातारचाळे करणारा, &c. Dot'ing a. खुळावलेला, नष्टबुद्धि. २ भुलून गेलेला, निरत, अत्यासक्त, मूर्खपणानें तन्मय झालेला. Dot'ingly adv. भुलून, वेडा होऊन, अत्यासक्तीनें. Dot'ish a. मुलाप्रमाणे अत्यासक्त, मूर्ख. Dottle &. मूर्ख. D. n. क्षीणबुद्धि m, अतिवृद्ध m. Dotty a. मनाचा हलका. Doth (duth ) 3rd. persusing. pres. of Do. Dotterel (dot-er-el ) n. अतिशय मूर्ख असा पक्षी m. २ साधा भोळा व मूर्ख मनुष्य m. To dor the dotterel भोळ्या मनुष्याला फसविणे. Doub grass (diob-gras' )m. bot. हरळी f, दूर्वा f. Double (dub-l) [O. Fr. doble, later double -L. duplus, lit. twice-full. L-duo, two; plus, full; L. duplus akin to Gr. diploos, double. ] a. twofold, multiplied by two, twice as much दुप्पट, दुणा, दुरा, द्विगुण, दुबार. [ D. WORK दुणे-दुहेरें काम n.] २ being in pairs, presenting two of a kind, coupled जुळा, जोड (in comp. जोडनळी), जोडगिरी or जोडगीर (loosely). ३ acting two parts, one openly and the other secretly, deceitful, insincere दुटप्पी वर्तनाचा, दोन मनांचा, आंत एक बाहेर एक असा, लपंडावाचा, व्यर्थी, कपटी. ४ bot. having the petals in a flower considerably increased beyond the natural number एकाहून अधिक पांकळ्यांची वर्तुळे असलेलें फूल; उ० बटमोगरा. ५ द्वित्त (e.g. क्क, ग्ग, च्च).