Jump to content

पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

AnyTHIस्तावना.ESTHMAN ११ झालेला रसगंगाधरग्रंथ; आणि दुसरीही काही पुस्तके यांच्या आधारार्ने प्रस्तुत भाषांतर तयार केले आहे. हे भाषांतर सगळे छापून तयार झाल्यावर दुसरे परिशिष्ट लिहिण्याचा आयते वेळी विचार झाला. त्यामुळे ते फार घाईने लिहावे लागले. यास्तव सदर परिशिष्टांत प्रमादस्थलें राहिली असतील. शिवाय भाषांतरांतही दोष आढळतील. त्या सर्वांचे संशोधन करून प्रस्तुत अल्प प्रयत्नास पूर्णता आणण्याचे श्रेय काव्यरसज्ञ सहृदय विद्वान् आपणांकडे घेतील अशी आशा आहे. पुणे, सदाशिवपेठ. श्रावण व. शके १८२५. लक्ष्मण गणेशशास्त्री लेले.